फळांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ली जाणाऱ्या द्राक्षांध्ये अनेक उपयुक्त औषधी गुण देखील आहेत. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी असल्याचे आहार तज्ज्ञांचे मत आहे. द्राक्षांमध्ये ए, सी आणि बी ६ ही जीवनसत्व असून, मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि सेलेनिअमचे प्रमाण आहे. द्राक्षामध्ये फ्लेओनॉइड हा घटक असल्यामुळे त्यांचा उपयोग अँटीऑक्सिडंटस म्हणून होतो. घसा जळजळणे, पोटदुखी, आंबट ढेकर, अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे चांगला उपाय ठरू शकतात. द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. द्राक्षांपासून तयार केलेला मनुक्यात देखील अनेक औषधी गुण आहेत. रोज मुठभर मनुके खाल्ल्यास वरील आजारांवर मात होण्यास मदत होवून, वेळेवर भूक लागते. तापानंतर आलेल्या अशक्तपणावर मनुका उपयुक्त ठरू शकतो. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका पित्तनाशक असल्याचे तज्ज्ञ मानतात. क्षयरोगामध्ये येणारा अशक्तपणा मनुके खाण्यामुळे कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुत्रपिंडाच्या विकारावर द्राक्षे अत्यंत गुणकारी माणली जातात.
पचनविकारांवर द्राक्ष उपयोगी
पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्ष उपयोगी असल्याचे आहार तज्ज्ञांचे मत आहे. द्राक्षांमध्ये ए, सी आणि बी ६' ही जीवनसत्व असून
आणखी वाचा
First published on: 29-01-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of grapes