उत्तम आरोग्यासाठी नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबुत व्हावी यासाठी त्यांनी दररोज किमान एक क्लास दूध पिण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे आढळतात. असे अनेक गुणधर्म आढळणारे दूध लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.
पोषकतत्त्व
दूधामध्ये कार्बोहायड्रेट्स, शरीरासाठी उपयुक्त फॅट्स, प्रोटीन असे अनेक पोषकतत्त्व आढळतात. जे लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरते.
दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटामिन डी आढळते. हे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
दूधात आढळणारे झिंक, सेलेनियम, विटामिन ई यांमुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हायड्रेशन
दूधामध्ये ८७ टक्के पाणी असते, त्यामुळे नियमित दूध प्यायल्याने मुलांना हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)