हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीपासून आपल्या शरीराकरता कोणते इतर देखील फायदे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.
हळदीच्या दुधाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हळद घातलेले दुध किंवा हळदीचे दुध अनेक आरोग्यकारी गुणांनी युक्त आहे. हळदीमध्ये असलेल्या अँटी बायोटिक प्रॉपर्टीज आणि दुधामध्ये असलेले कॅल्शियम यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.
वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हळदीमुळे मेदाचे (फॅट्सचे) विघटन होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार जाडपणा घालवण्याचा महत्वाचा टप्पा असणारा भाग म्हणजे फॅट बर्न. हळद या फॅट बर्नला सुरुवात करते.
झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात.
अनेकदा हलका मार लागल्याने किंवा स्नायूवर ताण आल्याने, मुरगळल्याने शरीराच्या त्या भागातील रक्ताभिसरण काही काळ प्रभावित होते. हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण पुनश्च सुरळीत होण्यास मदत होते