हिरव्या गरांचा पावटा हा भारतात भरपूर प्रमाणात आढळतो. पावटा हा अत्यंत पाचक आहे, तसेच पावट्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे भूक कमी लागणे, अपचन, आम्लपित्त या विकारांवर पावटा गुणकारी आहे. पावट्याचा गरच नाही तर शेंगांचाही वापर औषधासाठी केला जातो. अनेकजण पावट्याच्या गुणधर्मापासून अनभिज्ञ असतात म्हणूनच या गुणकारी पावट्याविषयी थोडक्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॉकलेट ब्रँड्सना टक्कर देणार किट-कॅटचा ‘हा’ अनोखा फ्लेव्हर

…म्हणून दिवसातून एक केळे खा!

मुले सतत गोड खात असतील तर ‘हे’ उपाय करुन पाहा

– पावटा हा महिलांसाठी अधिक गुणकारी आहे. ज्या महिलांना मासिक पाळीच्यावेळी त्रास होतो किंवा वेदना होतात त्यांनी पावट्याचा रस प्यायल्यास नक्कीच आराम पडतो.
– कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावटयाची भाजी नियमितपणे आहारात खावी त्यामुळे त्रास लवकर कमी होतो.
– पावट्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत, त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास वारंवार जाणवत असल्यास शेंगाचा काढा करून तो प्यायल्यास पोटात होणारी जळजळ कमी होते.
– शरीरावरील जखम लवकर भरून काढायची असल्यास पावट्याची भाजी खावी. यामुळे जखम भरून निघते.
– कॅल्शिअमची, ब आणि क जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी देखील पावटे गुणकारी आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benifits of hyacinth bean pavta in marathi