भारतातील बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोटनंतर कोणती कॉमन गोष्ट असेल तर ती म्हणजे अंघोळीचा साबण. आजही अनेक कुटुंबात दररोज आंघोळीसाठी सर्वजण एकच साबण वापरतात. एकाच ताटात जेवण खाल्ल्याने प्रेम वाढते असे म्हटले जाते पण एकाच साबणाने सर्वांनी आंघोळ करणे कितपत योग्य आहे? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? कुटुंबातील काहींना त्वचेसंबंधीत आजार असतात अशावेळी त्या व्यक्तीचा साबण कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरला तर त्याची लागण त्यांनीही होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणे चुकीचे की बरोबर? यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरावा की नाही?

तुम्ही आंघोळीसाठी वापरत असलेल्या साबणावर अनेक जंतू असतात. इंडियन जर्नल ऑफ डेंटल रिसर्चनुसार, एप्रिल – जून २००६ च्या अभ्यासात असे आढळून आले की, तुम्ही आंघोळीसाठी वापरत असलेल्या साबणावर २ ते ५ प्रकारचे जंतू असतात. तर अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलच्या जुलै २०१५ च्या अहवालानुसार, अंघोळीचा साबण सुमारे ६२ टक्के बॅक्टेरिया असतात, तर लिक्विड सोपमध्ये ३ टक्के बॅक्टेरिया असतात. साबणावर लपलेले बॅक्टेरिया एखाद्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात.

आंघोळीच्या साबणावर किती जंतू असतात?

आरोग्य तज्ञांच्या मते, आंघोळीच्या साबणावर ई. कोलाय, साल्मोनेला आणि शिगेला बॅक्टेरिया, नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरस आणि स्टेफ सारख्या बॅक्टेरियांचा समावेश असू शकतो. यांपैकी काही त्वचेवर जखमा किंवा ओरखड्यांद्वारे पसरतात, तर काही विष्ठेद्वारे पसरतात.

तोच साबण इतरांनी वापरला तर काय होईल?

तोच साबण इतरांनी वापरणे काही प्रमाणात सुरक्षित असले तरी संसर्ग पसरण्याचा धोका असतो. फ्लोरिडा विद्यापीठाच्या फुटबॉल खेळाडूंवर २००८ मध्ये एक अभ्यास करण्यात आला, ज्यात सर्व खेळाडूंनी एकच साबण वापरला होता. त्यांन मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टॅफिलोकोकस ऑरियस (MRSA), एक अँटीबायोटिक-प्रतिरोधक स्टॅफ संसर्ग होण्याची शक्यता जास्त होती. यामुळे यूएस सीडीसी देखील साबणासारख्या वैयक्तिक वस्तू शेअर न करण्याची शिफारस केली.

आंघोळीच्या साबणाने संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे?

आंघोळीसाठी एकच साबण वापरल्याने आरोग्यास मोठा धोका नाही. मात्र, तरीही हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका लक्षात घेता कुटुंबातील सर्वांनी एकच साबण वापरु नका. साबण शेअर करायचा नसेल तर तुम्ही लिक्विड सोप किंवा बॉडी वॉश देखील वापरु शकता. तुम्ही झिरो- टच डिस्पेंसर असलेला साबण निवडू शकता.

२) आंघोळीसाठी तुम्ही कुटुंबात एकच साबण वापरत असाल तर तो वापरताना प्रत्येकाने धुवून घ्या. यानंतर साबण वापरून झाल्यानंतर तो धुवून स्वच्छ सुकवत ठेवा. कारण ओल्या साबणावर स्किन सेल्ससह बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.

३) यानंतर ड्रेनिंग सोप डिशचा वापरा आणि नियमितपणे धुवा आणि स्वच्छ करा.

४) कुटुंबातील सर्वजण एकच साबण वापरत असाल तर आधी कोणालाही काही त्वचेसंबंधीत विकार आहे की नाही याची माहिती घ्या. जेणेकरुन तुम्हाला कोणता संसग्र होणार नाही.