Benefits Of Khus Water: निसर्गात अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, ज्याचे आपण सेवन करत नाही, त्याला विशेष मानत नाही, तर अशा गोष्टींमध्ये आश्चर्यकारक गुणधर्म असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे वाळा. हल्ली लोक वाळा वापरायला विसरत आहेत, पण ज्या काळात फ्रीज नव्हते त्या काळात लोक शरीराला थंडावा देण्यासाठी वाळा वापरत होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वाळाचा वापर करून तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूमुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. वाळ्याच्या पाण्याचे सेवन करूनही तुम्ही शरीराला थंड ठेवू शकता. जाणून घ्या काय आहे वाळा आणि त्याचे पाणी पिण्याचे फायदे?
वाळा म्हणजे काय?
गवताच्या प्रजातीत मोडणाऱ्या वाळ्याचं शास्त्रीय नाव Vetiveria Zizanioides असं आहे. हे १००% भारतीय असून पहिल्या नजरेत दिसायला ते गवती चहासारखा दिसतं. वाळ्याला चकचकीत हिरवीगार अशी ही पाने असून ती भरपूर लांब, रुंदीला कमी आणि टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. याची पाने बुडापासून वरपर्यंत अगदी समांतर असतात. ही पाने थोड्या फार प्रमाणात खरखरीत लागतात. जास्तीत जास्त दीड मीटर इतक्या उंचीपर्यंत याचे झाड असतं. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात असतो त्या ठिकाणी वाळा आढळून येतो. वाळ्यांच्या मुळ्यांना जर चांगलं पोषण, हवामान, हवा आणि पाणी मिळालं तर ती जवळजवळ ३०य३५ सेंमीपर्यंत वाढतात. वाळ्याचं गवत रूजून ते मोठं होऊन काढणीसाठी तयार व्हायला जवळपास दोन वर्षे लागतात.
उन्हाळ्यात वाळ्याच्या पाण्याचे सेवन कसे करावे?
तुम्ही तुमच्या पाण्याच्या माठात वाळा टाका आणि त्या माठातले पाणी प्या. तुम्ही वाळा एका माठात ३ दिवस ठेवू शकता, त्यानंतर तुम्ही माठ धुवून उन्हात वाळवू शकता. ज्यावेळी तुम्ही माठात वाळा टाकाल तेव्हा ते हळुहळू खाली बसेल. त्यानंतर तुम्ही वाळ्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.
उन्हाळ्यात वाळ्याचे पाणी पिण्याचे फायदे
शरीराची दुर्गंधी दूर करा
उन्हाळ्यात शरीराला दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे, यापासून बचाव करण्यासाठी वाळ्याच्या पाण्याचे सेवन करावे. वाळ्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील दुर्गंधीच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
पोट साफ होईल
पोट साफ करण्यासाठी वाळ्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी वाळ्याचे पाणी जरूर प्यावे. वाळ्याचे पाणी पोटाला थंडावा देतं आणि तुमच्या पोटात गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या होत नाहीत.
केसांची समस्या दूर करा
वाळ्याच्या पाण्याचे सेवन केल्यास उन्हाळ्यात केसगळतीपासून सुटका मिळते. ज्या लोकांना उन्हाळ्यात टाळूला खाज येण्याची समस्या असते त्यांनी वाळ्याचे पाणी प्यावे.