Diabetes Diet Chart: हिवाळ्याच्या काळात ओलावा वाढतो, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशीची वाढ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे व्हायरल ताप, संसर्ग आदींचा धोका वाढण्याची शक्यता असते. परंतु ही अशी वेळ आहे जेव्हा शरीराच्या तापमानात बदल झाल्यामुळे शरीराला संतुलन साधण्यास वेळ लागतो. अशावेळी क्रोनिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डॉक्टर मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देतात जेणेकरुन शरीरात अचानक झालेल्या बदलांमुळे खराब झालेल्या गोष्टी संतुलित करता येतील. खरं तर, काही गोष्टी अशा असतात की हिवाळ्यात शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखर वाढू देत नाही. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमेहींसाठी आहार

दालचिनीचा चहा

एव्हरीडेहेल्थनुसार, थंडीच्या दिवसात चहा किंवा कॉफी प्रत्येकाच्या आवडीची बनते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल दालचिनीचा चहा घ्या. दालचिनीमध्ये खूप कमी कर्बोदके असतात. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. याशिवाय दालचिनीचा चहा हृदयाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: Blood Sugar: ब्लड शुगर वाढल्यास पायात दिसतात ही ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या पायाच्या कोणत्या भागात होतो त्रास)

स्प्राउट्स

स्प्राउट्स म्हणजे अंकुरलेले संपूर्ण धान्य. तसे, संपूर्ण धान्य हे एक सुपर फूड आहेत. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने कमी होते. एक कप स्प्राउट्समध्ये फक्त १४ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये ६ ग्रॅम डायटरी फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते.

रताळे

रताळे खूप गोड असतात. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यात जास्त कर्बोदके आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक परफेक्ट फूड आहे. रताळ्यामध्ये फोटोकेमिकल बीटा कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. त्यामुळे ते डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

( हे ही वाचा: ब्लड प्रेशर उजव्या हाताने मोजायचा की डाव्या? जाणून घ्या बीपीचे चुकीचे रीडिंग कशामुळे येते)

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये सुपर फूडचे गुणधर्म असतात. हिवाळ्यात मधुमेहींनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. एक कप भोपळ्याच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट कमी असते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

काजू

काजू हे मधुमेहींसाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. काजू फक्त हृदयरोगींसाठी आरोग्यदायी नसून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. काजूमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि हेल्दी फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. या सर्वांशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी खोबरेल तेल, मासे, फ्लेक्ससीड्स, चिया बिया इत्यादींचे सेवन करावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health diet for diabetic patients in winter these 5 food to reduce blood sugar gps