Acidity Ayurvedic Treatment: दिवाळी उरकली? फराळ संपला का? सकाळ- दुपार-संध्याकाळ फराळ खाऊन पोट, वजन आणि ऍसिडिटी सगळंच वाढतं, हो ना? सणउत्सवाच्या दिवसांमध्ये बहुतांश वेळा तोंडावर ताबा ठेवणं शक्यच होत नाही, परिणामी कधीही व कितीही खाण्याचे प्रमाण वाढते. खाताना जरी मज्जा वाटत असली तरी जिभेचे चोचले नंतर आपल्या समस्या वाढवू शकतात. तुम्हीच सांगा मागील काही दिवसांमध्ये विशेषतः संध्याकाळच्या वेळी अचानक ऍसिडिटी वाढल्याचं जाणवतंय का? धड ढेकर येत नाही पण छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? आज याच त्रासावर आपण सहज करता येणारे आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत…

अन्नाची पचनप्रक्रिया सुरु असताना गॅस्ट्रिक ग्रंथींमधून ऍसिड स्रवते. जर या ऍसिडचे प्रमाण वाढले तर आपल्याला आंबट, करपट ढेकर येऊ लागतात. २००५ मधील वैद्यकीय संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार इतर देशांच्या तुलनेत आशियाई देशांमध्ये ऍसिडिटीचे प्रमाण १० ते २० टक्के अधिक आढळून आले आहे. जेव्हा अन्ननलिका (गळा व पोट जोडणारी नलिका) कमकुवत होते तेव्हा पोटातील आम्ल वाढून वरील बाजूस येऊ लागते. यामुळे छातीत जळजळ जाणवते.

firecrakers side effects on body
फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
Maharashtra rain weather updates
दिवाळीच्या स्वागताला विजांची रोषणाई, ढगांचे फटाके अन् खराखुरा पाऊस !
do patti
अळणी रंजकता
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!

संध्याकाळीच का जाणवतो ऍसिडिटीचा त्रास?

सूर्यास्ताच्या नंतर शरीराला व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात मिळते परिणामी याचा प्रभाव पचनक्रियेवर दिसून येतो. म्हणूनच काहींना संध्याकाळच्या वेळी ऍसिडिटीचा त्रास अधिक जाणवतो. यामुळे काही व्यक्ती रात्रीचे जेवणही टाळतात, मात्र आपण हे चार आयुर्वेदिक उपचार वापरून तुमच्या समस्यांवर वेळीच उपाय करू शकता.

ऍसिडिटी व गॅसवर आयुर्वेदिक उपचार

ज्येष्ठमध

आयुर्वेदाच्या माहितीनुसार, ज्येष्ठमधाच्या सेवनाने गॅस्ट्रिक ग्रंथींची सूज कमी होण्यास मदत होते. यासाठी जेवणाआधी १ कप पाणी घेऊन त्यात ज्येष्ठीमधाच्या दोन ते तीन काड्या टाकून कोमट होईपर्यंत उकळून घ्यावे. तुम्हाला जर गॅसचा त्रास असेल तर याने शरीर डिटॉक्स व्हायला मदत होऊ शकते.

कोरफड

एनसीबीआई (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन) मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार कोरफडीत गैस्ट्रोप्रोटेक्टिव सत्व असतात. कोरफडीच्या गराचे सेवन पोटातील आम्ल नियंत्रणात ठेवण्यास तसेच गॅस्ट्रिक अल्सरच्या समस्यांवर आराम देण्यास मदत करते. कोरफडीच्या रसाचे सेवन केवळ ऍसिडिटीच नव्हे तर केसगळती, पिंपल अशा तक्रारींवरही उत्तर ठरते.

आलं

ऍसिडिटीमध्ये आल्याचं पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळण्यास मदत होते. कर्नाटक येथील फादर मुलर मेडिकल कॉलेजने प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, आल्यातील अँटी ऑक्सिडंट व गैस्ट्रोप्रोटेक्टिव सत्वांमुळे गॅसवर आराम मिळतो. तसेच गॅस्ट्रिक अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन, मळमळ व उलटी असे त्रास कमी होण्यात मदत होते. आल्याचा तुकडा कोमट पाण्यात उकळून पाणी प्यायल्याने किंवा आल्याचा तुकडा मीठ लावून चघळल्यानेही मदत होऊ शकते. मिठाने आल्याची उग्रता कमी होण्यास मदत होते.

Uric Acid: शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे; बोटांना सूज, थकव्यासह दिसून येतात ‘ही’ लक्षणे

जिरं/ कॅरावे सीड

कॅरावे सीड या मेरिडियन बडीशेप किंवा पर्शियन जिरं या नावानेही ओळखल्या जातात. पोटासंबंधित विकारांवर उपचार म्हणून जिऱ्याचा वापर करण्याचा सल्ला अनेक वैद्यकीय तज्ज्ञ देतात. एनसीबीआईच्या माहितीनुसार, अपचनाचा उपचार म्हणून जिऱ्याचे पाणी प्यायलास त्वरित आराम मिळू शकतो. जिऱ्यात अँटी इन्फ्लेमेंटरी व अँटी ऑक्सिडंट गुण असतात ज्यामुळे पोटात तयात होणाऱ्या अतिरिक्त गॅस्ट्रिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

Ayurveda Tips: जेवणानंतर आंघोळ का करू नये? अपचनाचा त्रास असलेल्यांनी आयुर्वेदातील हे उत्तर जाणून घ्या

(टीप- वरील उपाय हे आयुर्वेदिक व घरगुती आहेत, त्रास वाढत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर ठरेल)