नॉटिंगहॅम: जेव्हा एखाद्या महान खेळाडूच्या कारकीर्दीकडे आपण पाहतो, तेव्हा त्याच्या या यशात झोपेचा महत्त्वाचा वाटा असतो याचा विचार आपल्यापैकी फार थोडे जण करतात. मात्र जगातील अनेक आघाडीच्या खेळाडूंनी त्यांच्या दैनंदिन प्रशिक्षणात झोप हा महत्त्वाचा घटक असून, त्यातूनच त्यांची कामगिरी उंचावल्याचे नमूद केले आहे.
तुम्ही जर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी झटत असाल तर मग पुरेशी झोप महत्त्वाची आहे. जर पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम होतात. जर तुम्ही केवळ पाच तास झोप घेत असाल तर मग शरीरातील संतुलन बिघडते. शांत झोपेसाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. रोजची झोपेची वेळ निश्चित हवी. झोपेला जाण्यापूर्वी आपली दैनंदिन कामे पूर्ण करा, म्हणजे कोणताही तणाव राहणार नाही. पुस्तके वाचा किंवा संगीत ऐका यातून उत्तम झोप लागेल.
गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील तापमान कमी होऊन ते लाभदायक ठरते. झोपण्याच्या खोलीत उत्तम वातावरण ठेवा, जास्त प्रकाश नको, कारण त्यामुळे परिणाम होतो. त्यामुळे कमीत कमी प्रकाश ठेवण्याचा प्रयत्न करा. खोली थंड राहील अशी रचना हवी, मात्र अगदी गारही नको. अति उष्ण कींवा अति थंड वातावरणामुळे झोपेवर परिणाम होतो. दिवसभर कार्यरत राहिल्यास उत्तम झोप लागते. त्यामुळे रोज व्यायाम आवश्यक आहे. रोज किमान सात ते नऊ तास झोप घेतल्यास तंदुरुस्ती चांगली राहील.