Drink Water Before Brushing : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ब्रश केल्याकेल्या गरम वाफाळत्या चहा किंवा कॉफीने होते. प्रमाणित योग प्रशिक्षक आणि होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. नूपोर रोहतगी यांच्या माहितीनुसार, चहा, कॉफी, नाष्टा किंवा अगदी ब्रश करण्याआधी सुद्धा आपण एक ग्लास पाण्याने सकाळची सुरुवात करणे ठरू शकते. आपल्या शरीराला नेमकं किती प्रमाणात पाण्याची गरज आहे याविषयी अनेकजण सांगतात पण नेमक्या कोणत्या वेळी तुम्ही पाणी प्यायला हवे हे मात्र सांगितले जात नाही. डॉ. रोहतगी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये याविषयीच माहिती दिली आहे.
डॉ. रोहतगी सांगतात की, कामाच्या व्यापात दिवसभर पाणी पिणं शक्य होईलच असे नाही. पण कोणतेही काम सुरु करण्यापूर्वीच जर आपण शरीर हायड्रेट करण्याची सवय लावून घेतली तर शरीराचे तापमान नियंत्रणात राहू शकते. याशिवाय मूत्रपिंडातील कचरा बाहेर काढणे, लाळ तयार करणे आणि शरीराच्या विविध अवयवांना पोषक तत्वे उपलब्ध करून देणे यासारखी शारीरिक कार्ये देखील सुरळीत होऊ शकतात. यासाठी सकाळी झोपेतून उठताच पाणी पिणे आवश्यक आहे.
फिटनेस तज्ज्ञ सोनिया बक्षी यांनीही झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला. हे आजारांशी लढण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते, असे त्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
सकाळी ब्रश न करता पाणी पिण्याचे फायदे..
व्यक्ती झोपेत असताना तोंडात बॅक्टेरिया तयार होतात; जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पितात तेव्हा तुम्ही ते बॅक्टेरिया पाण्यासह निघून जातात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
अपचनाची समस्या दूर होऊन पचन सुधारण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते
हे ही वाचा<< किडनी खराब होण्याचा धोका वाढवतात ‘हे’ घरगुती पदार्थ; युरिक ऍसिड वाढून हातापायावर दिसतात ‘ही’ लक्षणे
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होऊन तोंडाचे आरोग्यही नियंत्रित राहते.
पाण्यामुळे तोंडात आवश्यक लाल तयार होते ज्यामुळे तोंड व घसा कोरडा पडणे असा त्रास होत नाही.
सकाळी पाणी कसे व किती प्यावे?
रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. “उठल्याबरोबर निदान एक व जास्तीत जास्त दोन ग्लास पाणी प्या. पाणी पिताना घाई करू नका, स्वस्थ बसा आणि एक एक घोट पाणी प्या.