नवी दिल्ली : विवाह सोहळे, मेजवानी, मिरवणुका अशा ठिकाणी ‘लाऊड स्पीकर’चा वापर वाढत आहे, परंतु हे ध्वनिप्रदूषण प्रकृतीवर अत्यंत गंभीर परिणाम करतात. या संदर्भात करण्यात आलेल्या वेगवेगळय़ा संशोधनांतही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मानसिक आरोग्यावर परिणाम : आरोग्यसंबंधी काम करणाऱ्या संस्थांनुसार ध्वनिप्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोठय़ा आवाजाबाबत मानवी मेंदू सतत सतर्क असतो. त्यामुळे दीर्घकाळ ध्वनिप्रदूषणाचा जाच सहन केल्याने नैराश्य आणि तणाव यासारख्या व्याधी जडण्याची शक्यता अधिक असते, असे संशोधक सांगतात. 

झोपचे वेळापत्रक बिघडते : ध्वनिप्रदूषणामुळे झोपेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. मोठय़ा आवाजामुळे अचानक झोपमोड होते. झोप पूर्ण न झाल्याने एकाग्रता आणि वर्तनही बदलते. चिडचिडेपण वाढते. त्यामुळे त्याचे परिणाम शरीरावरही दिसतात.

अनेक व्याधींना आमंत्रण : ध्वनिप्रदूषण फक्त मानिसक आरोग्य नव्हे, तर शारीरिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरते, हे संशोधनामुळे अधोरेखित झाले आहे. ऐकण्याची क्षमता कमी होणे, रक्तदाब वाढणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे आदी त्रास यामुळे सहन करावे लागतात. गर्भवती आणि गर्भालाही यामुळे मोठा धोका असतो.