धोका मोठा असेल तर शक्यता कितीही कमी असली तरी आपण ती जोखीम घेत नाही. पण हे आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत करतो का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फायदा मिळवायचा म्हटलं की थोडीफार जोखीम तर असणारच, असा विचार व्यावसायिक मंडळी नेहमीच करतात. शेअर बाजारात उलाढाल करणारे बरेचदा कॅलक्युलेटेड रिस्कबद्दल बोलत असतात. कॅलक्युलेटेड रिस्क म्हणजेच एखादी गोष्ट करण्यापूर्वी ते करताना काय संभाव्य धोके आहेत याचा विचार करून जोखमीचा अंदाज घेणे आणि आपल्याला ती जोखीम पेलवेल का? हे ठरविणे.
रिस्क कॅल्क्युलेट करायचं म्हटलं म्हणजे जोखीम आहे हे आपण मान्य केलंय, प्रश्न आहे- जोखीम मोजणार कशी? त्यासाठी एक सूत्र आहे. गणितात जसे समीकरण मांडून उत्तर शोधतात तसेच इथेही एक समीकरण आहे
जोखीम = संभाव्य धोक्याची तीव्रता x संभाव्य धोक्याची शक्यता
उदाहरणार्थ : एका टेबलावर १०० वाटय़ा ठेवल्या आहेत, त्यापैकी एका वाटीखाली १०० रुपये आहेत. तुम्ही एका रुपयाचे तिकीट काढून एक वाटी उचलू शकता. जर तुम्ही उचललेल्या वाटीखाली १०० रुपये असले तर ते तुम्हाला मिळतील. इथे संभाव्य धोका एक रुपया गमावण्याच्या आणि गमावण्याची शक्यता ९९ टक्के म्हणजे जोखीम दिसायला मोठी परंतु धोकाच मुळात अगदी किरकोळ आहे. केवळ एकच रुपया जाणार पण मिळाले तर १०० रुपये मिळणार या कारणास्तव बहुतेक जण ही जोखीम घ्यायला तयार होतील अगदी ९९ टक्के हरण्याची शक्यता असूनसुद्धा.
आता आपण दुसरे उदाहरण घेऊ या. मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळाल्याबद्दल एका गृहस्थाने आपल्या ऑफिसातल्या मित्रांसाठी १०० पेढय़ांची ऑर्डर दिली. हलवायाकडे ९९ पेढे होते त्याने एक पेढा शेजारच्या हलवायाकडून मागवला व प्रत्येक पेढा रंगीत कागदात गुंडाळून बॉक्समध्ये ठेवले. पेढय़ांची डिलिव्हरी दिल्यानंतर त्याला असे समजले कीशेजारच्या हलवायाकडचा पेढा खाल्ल्यामुळे काही जणांना विषबाधा झाली. त्याने लगेच ही बातमी आपल्या ग्राहकाला कळवली, परंतु तोपर्यंत आपल्या गृहस्थाने पेढे वाटले होते, पण सुदैवाने कुणीही पेढा खाल्ला नव्हता. त्या गृहस्थाने सगळ्यांना ही गोष्ट सांगितली की तुम्हा १०० जणांपकी कुण्या एकाचा पेढा दूषित आहे. त्याने असे म्हणताच सगळ्यांनी आपआपले पेढे कचरा पेटीत फेकून दिले. या ठिकाणी विषबाधा होण्याची शक्यता फक्त एक टक्का होती तरीही ही जोखीम कुणीच घेतली नाही. पेढा फेकण्याचा निर्णय क्षणात घेतला. फारसा विचारही करण्याची गरज कुणाला वाटली नाही.
थोडक्यात काय तर धोका मोठा असेल तर शक्यता कितीही कमी असली तरी आपण ती जोखीम घेत नाही. वर्तमानकाळातल्या संकटांचा सामना करताना आपल्याला भूतकाळातील अनुभव कामी येतो आणि त्या बळावर आपण भविष्यकाळातल्या येऊ घातलेल्या संकटांचा सामना करण्याचे धोरण / रणनीती आखतो. आरोग्याच्या बाबतीतही (खरं तर इथे अनारोग्याच्या बाबतीत म्हणायला हवे) आपले धोरण असे असते का?
मानवाला होणाऱ्या कित्येक रोगांचे कारण ठामपणे सांगता येत नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्रात विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आणि नवनवीन संशोधनामुळे आपल्याला अनेक रोगांच्या कारणांचे आकलन झाले आहे. त्याचबरोबर रोगाला पूरक किंवा साहाय्यक अशा गोष्टींबद्दलचे पुरावे मिळू लागले आहेत. यातले काही पुरावे वादग्रस्त आहेत तर काही निर्वविाद आहेत. अशाच काही निर्वविाद पुराव्यांच्या साहाय्याने जोखमीचे मोजमाप करता येते. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण हे मोजमाप खरंच गांभीर्याने घेतो का? वेगवेगळ्या धोक्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक ठिकाणी खबरदारीची उपाययोजना राबवत असतो. कॉम्प्युटरला व्हायरसपासून वाचवण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असो नाहीतर एखाद्या महागडय़ा यंत्राचा वार्षकि देखभाल करार असो आपण होणाऱ्या त्रासाची तीव्रता व शक्यता आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च या गोष्टींचा मेळ जुळवत असतो. जोखीम किती याचा अंदाज घेत असतो. या ठिकाणी आपल्याला धोका वा जोखीम काय ते माहीत आहे. म्हणजे त्याची जाणीव आहे आणि त्याचे मोजमापसुद्धा केलेले आहे. त्यामुळेच त्यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करायची हे ठाऊक आहे. ही दूरदृष्टी जशी महागडय़ा यंत्रांच्या बाबतीत आपण दाखवतो तशीच आरोग्याच्या संदर्भातही दिसते का?
आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला हे व्यवस्थित माहीत आहे की, आपल्या तब्येतीच्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील बहुतेक तक्रारींची जननी आहे- दूषित पाणी, दूषित हवा, दूषित ध्वनी, चुकीचे अन्न, चुकीचे (अयोग्य) वागणे आणि चुकीचे (अयोग्य) बोलणे. आपल्या सगळ्यांना या षडरिपूंच्या अपकारक शक्तीची जाणीव आहे, परंतु यापैकी अन्न, पाणी आणि हवा यांचा धाक बहुतेकांना असतो, बाकीच्या गोष्टी मात्र व्यक्तिसापेक्ष, असे का?
आपल्या आरोग्याला हानीकारक असे काही दिसले की सर्वप्रथम यासाठी कोण जबाबदार याचा शोध सुरू होतो आणि दोषारोपणासाठी जागा मिळाली की आमचा आत्मा शांत. अशी मानसिकता काही उपयोगाची नाही. कुठल्याही चुकीच्या गोष्टींसाठी जबाबदार व्यक्ती असो व यंत्रणा, आजारी मात्र आपल्यालाच पडायचे आहे हे विसरून कसे चालेल? चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे कारण अन्याय सहन करणं ही पशुवृत्ती आहे. परंतु हे सामाजिक भान ठेवताना वैयक्तिक पातळीवरसुद्धा आपल्याला जागरूक राहणे आवश्यक आहे.
हवेचे प्रदूषण हा आपल्याकडचा अत्यंत ज्वलंत आणि धुरकट प्रश्न. हवेचे प्रदूषण अनेक शारीरिक विकारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत आहे. दम्याच्या रुग्णांना याचा प्रत्यय वारंवार येतो. प्रदूषित हवेचा सामना आपल्याला रोजच करावा लागतो. म्हणजे जोखीम मोठी आहे. वेळीच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा दिल्ली दूर नाही. हवेच्या प्रदूषणाला मी कसं कमी करणार, असा निरागस प्रश्न मनात डोकावत असेल तर रस्त्यावर दिवसागणिक वाढत जाणारी वैयक्तिक वाहनांची संख्या, क्रिकेट मॅचनंतरचा फटाक्यांच्या माध्यमातून साजरा होणारा आनंदोत्सव, फटाके आणि शोभेच्या दारूकामामुळे प्रदूषणात होणारी अक्षम्य वाढ या सर्व गोष्टींची जबाबदारी कुणावर टाकायची हे ठरवावे लागेल. प्रदूषित हवेएवढाच अवाजवी आवाजाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मिरवणुकीत कानाच्या पडद्याच्या सहनशक्तीपलीकडे पोहोचलेला ढोल पथकांचा दणदणाट, प्रसंगाशी काडीचाही संबंध नसलेली थिल्लर गाणी मोठमोठय़ा स्पीकरवर आणि डीजे सिस्टीमवरून वाजत असतात तेव्हा त्या आवाजाच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेली कंपने स्वर्गापर्यंत पोहोचत असतील का, असा भाबडा प्रश्न माझ्या मनात असंख्य वेळा आलाय. या ध्वनिप्रदूषणाचा श्रवण यंत्रणेवर, हृदयावर, रक्तदाबावर होणारा वाईट परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणजे जोखीम आहे हे आपण जाणतो, तरीसुद्धा त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत अशा पद्धतीने आपण वागतोय का? हॉस्पिटलमध्ये वारंवार फिट्स येतात म्हणून भरती झालेले चार-पाच महिन्यांचे बाळ, फटाक्याच्या आवाजाने दचकून रडत होतं. त्यावर त्या बाळाची आई जणू माझीच समजूत काढावी अशा थाटात मला म्हणाली, ‘‘पोराची पयलीच दिवाळी हाय ना, म्हणून त्याला या आवाजाची सव नाय.’’ थोडक्यात या गगनभेदी आवाजाची आपल्या मुलांना सवय व्हावी, असं आम्हाला वाटत असेल तर मग जोखमीचे मोजमाप करून काय उपयोग? खरं म्हणजे आपल्या मुलांना या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे दुष्परिणाम सांगायलाच पाहिजे आणि या माहितीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ते आपल्या आचरणातून त्यांच्या मनावर िबबवले पाहिजे. समाजातल्या सर्व थरांतून या आवाजाविरुद्ध जोपर्यंत आवाज उठत नाही, तोपर्यंत दुष्परिणामाचे मोजमाप करण्यात आपला वेळ आणि श्रम का वाया घालावा?
जिवाची मुंबई करायला आलेल्या एका नवविवाहित जोडप्याला मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणे महागात पडले आणि अन्नविषबाधेमुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. हॉस्पिटलमध्ये घालवलेले ते तीन दिवस मधुचंद्राची कटू आठवण म्हणून आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतील यात शंका नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ा किंवा स्टॉल गरमागरम चविष्ट पदार्थ ज्या थाळीत तुम्हाला देतात, ती थाळी वा प्लेट त्याने गाडीच्या खाली ठेवलेल्या टबात बुचकळून कळकट फडक्याने ‘स्वच्छ’ करून दिलेली असते. हे सर्व उघडपणे सुरू असतं, परंतु चमचमीत पदार्थाचा घमघमाट आणि त्या डिशची चव घ्यायला आतुर झालेले मन याकडे दुर्लक्ष करते.
एवढे लोक इथे नेहमी खातायत म्हणजे चांगलंच असेल, क्वचित कुणाला त्रास होतही असेल पण तेवढी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? अशा उदार विचारांचे स्वगत म्हणत बरीच मंडळी येथे आनंदाने खात असतात. ज्यांना त्रास होतो ते सांगायला येत नाहीत, त्यामुळे अज्ञानातले सुख उपभोगत असतात. अन्नपदार्थ खरेदी करतानासुद्धा भेसळीचा विचार न करता वस्तू खरेदी केली जाते. भेसळीमुळे आरोग्याला धोका असू शकतो याचे विस्मरण होत असावे. पाण्याच्या बाबतीत बरीच जागरूकता आहे. बरेच जण बाटलीबंद पाण्याचा आग्रह धरतात पण ते सगळ्यांना परवडते असे नाही. नळाला आलेले पाणी शुद्ध असेलच याची खात्री नसते, तेव्हा पाणी किमान गाळून उकळून घेण्याची खबरदारी घ्यायला हवी कारण पोटाचे, आतडय़ाचे आणि यकृताचे विकार होण्याची शक्यता दूषित पाण्यामुळे होऊ शकते. दूषित अन्न खाताना बाटलीबंद मिनरल पाणी प्यायचे म्हणजे एका हाताने चोरी करायची अन दुसऱ्या हाताने दान करायचे असे काहीसे वाटते. दान केल्यामुळे मिळालेले पुण्य चोरीच्या पापाला झाकू शकत नाही.
जपानमध्ये म्हणे लोक इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असतात. आपली कुठलीही कृती ही वैयक्तिक जोखीम आणि सार्वजनिक जोखमीच्या निकषावर आधारित असली पाहिजे. बेफाम वेगात मोटारसायकल चालवणारे स्वत:बरोबर इतरांच्या जिवालाही धोका होऊ शकतो हे सोयीस्कर पद्धतीने विसरतात. व्यसन हा संपूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न आहे असं बरेच जणांना वाटत असते परंतु ते खरे नाही. धूम्रपान करताना तुमच्याजवळ बसलेली प्रिय व्यक्ती धूम्रपानाच्या दुष्परिणामांची वाटेकरी असते हे बऱ्याच लोकांना ठाऊक नसते. दारूबद्दल काय बोलावे? संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेलं हे व्यसन आज फॅशन झालं आहे. दारू आरोग्याला अपायकारक आहे हे माहीत असूनसुद्धा ‘लिमिट’मध्ये घेतली तर काही जोखीम नसते असे सांगणारे जाणकार गल्लोगल्ली सापडतील.
थोडक्यात कुठलीही गोष्ट आरोग्यासाठी जोखमीची असेल तर तिचे मोजमाप करण्याच्या फंदात पडू नका, कारण आरोग्याला जपायचे असेल तर ती गोष्ट टाळणे इष्ट.
डॉ. राजेंद्र आगरकर – response.lokprabha@expressindia.com