Symptoms of Bone Density: बहुतेक डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांच्या मते, हाडांच्या घनतेची समस्या म्हणजे वाढत्या वयात शरीरातील हाडे कमकुवत होऊ लागतात. वयाच्या ३० वर्षांनंतर सर्वच स्त्री-पुरुषांनी त्यांच्या आरोग्याची आणि हाडांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मानवी शरीरातील हाडे कॅल्शियम, प्रथिने आणि फॉस्फरस यांसारख्या अनेक खनिजांनी बनलेली असतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हाडांमध्ये आवश्यक खनिजांचे प्रमाण कमी होऊ लागते, त्यामुळे हाडांच्या घनतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात काही खनिजे असतात, जी वाढत्या वयाबरोबर कमी होऊ लागतात, खराब जीवनशैली किंवा इतर कोणत्याही शारीरिक रोगामुळे, घनतेची समस्या उद्भवते. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

हाडांची घनता कमी होण्याची लक्षणे

Healthline.com च्या मते, हातांची ग्रिप कमकुवत होणे, हिरड्यांमधील समस्या, नखं कमकुवत होणे आणि नखे तुटणे ही कमकुवत हाडांची लक्षणे असू शकतात. याशिवाय वयानुसार उंची कमी होणे, शरीराची स्थिती खराब होणे, लहान जखमांमध्ये हाडे फ्रॅक्चर किंवा फ्रॅक्चर होणे, पाठदुखी म्हणजेच कंबरेत सतत दुखणे ही हाडांची घनता कमी होण्याची लक्षणे आहेत.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

( हे ही वाचा: Brain Stroke: अचानक चक्कर किंवा डोकेदुखीची समस्या सतावतेय? या लक्षणांमुळे वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका, चुकूनही दुर्लक्ष करू नका)

हाडांच्या घनतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काय करावे

हाडांच्या घनतेच्या समस्येवर उपचार करण्यापूर्वी, त्याचे जोखीम घटक जाणून घेणे महत्वाचे आहे. हाडांच्या घनतेचे कारण जाणून, जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास उपचार आणि प्रतिबंध करणे सोपे होईल. घनतेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधोपचार सुरू करणे महत्वाचे आहे. घनतेच्या समस्येमध्ये थेरपी खूप फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे शारीरिक उपचार करता येतात. तुमच्या दररोजच्या कामात शारीरिक हालचाली आणि व्यायामाचा नक्की समावेश करा.

आहाराची विशेष काळजी घ्या

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ दररोज चांगल्या प्रमाणात घ्या. घनतेच्या समस्येमध्ये, हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन के, प्रोटीन आणि मॅग्नेशियमचा समावेश करा.

Story img Loader