विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे अलिकडेच निधन झाले. राजू हे ट्रेडमीलवर धावत होते, यादरम्यान त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयश ठरली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या निधनाने व्यायामाबद्दल आणि हृदयाच्या आरोग्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
फोर्टीस रुग्णालयाच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. झाकिया खान यांनी व्यायाम करणाऱ्यांसाठी काही सल्ले दिले आहेत. व्यायाम करताना काय करावे आणि काय नाही. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत माहिती त्यांनी सांगितली.
(मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, फरक दिसून येईल)
१) तुमचा आरोग्य स्कोअर तपासा
कुठलेही अतिरिक्त ताण टाकणारे व्यायाम जसे वेटलिफ्टिंग, क्रंच, डेडलिफ्ट्स आणि पुलअप करण्यापूर्वी आपली तणाव चाचणी करा. त्यापूर्वी असे व्यायाम करू नका. तणाव चाचणी करताना आरोग्य सेवादाता ट्रेडमीलवर तुम्ही चालत असताना तुमचे हृदयाचे ठोके तपासतात. ही चाचणी केल्याने आरोग्य तज्ज्ञला तुमचे हृदय कसे काम करत आहे आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे का याबद्दल माहिती मिळेल. तसेच तणाव चाचणी ही महत्वाची आहे कारण ती अतिव्यायामाने शरीराला होणारे धोके जे असामान्य हृदयाच्या ठोक्यांमुळे उद्भवू शकतात ते टाळू शकते.
२) हायड्रेटेड राहा आणि व्यायामापूर्वी काही खा
व्यायाम करताना पाणी पित राहावे. व्यायामाच्या कालावधीत पुरेसे पाणी पिल्याने तुमची कामगिरी चांगली राहील, विशेषत: जेव्हा तुम्ही घराबाहेर असाल तेव्हा. तसेच व्यायामादरम्यान पाणी पिल्याने तुम्हाला झालेली दगदग, दमछाक कमी होईल.
(सकाळी उठताना करा ‘या’ क्रिया, लवकर जाग येईल, दिवसही चांगला जाऊ शकतो)
३) उपाशीपोटी व्यायाम करणे योग्य नाही
उपाशीपोटी व्यायाम करताना तुम्हाला स्टॅमिना कमी मिळेल. याने रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला मळमळ वाटू शकते. असे होऊ नये यासाठी जीमला जाण्यापूर्वी थोडेस जेवण करणे चांगले राहील.
४) पुरेशी झोप घ्या
व्यायामाच्या काळात तुम्हाला किरकोळ दुखापत किंवा वेदना झाल्या असतील तर रात्रीची झोप तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करेल. जर तुम्हाला अपुरी झोप येत असेल तर ३० मिनिटांचा मध्यम एरोबिक व्यायाम तुमच्या झोपेची गुणवत्ता वावढवू शकतो.
(नैराश्य कमी करण्यात फायदेशीर ठरते सीताफळ, ‘या’ समस्यांपासून देते आराम)
५) योग्स पोस्चर ठेवणे
तुम्ही जीममध्ये नवे असाल तर तज्ज्ञाच्या सूचनेनुसार व्यायाम केलेला बरा. डेडलिफ्टमुळे पाठीचा कणा आणि लोअर बॅकच्या डिस्कवर गंभीर ताण येऊ शकतो. तुम्ही चुकीच्या पद्धतीने डेडलिफ्ट केल्यास नुकसान होऊ शकते. तसेच बायसेप कर्ल करताना तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवणे आणि बाजूला न झुकणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर, माहिती नसताना अतिरिक्त भार उचलल्याने व्यक्तीच्या महाधमनीला नुकसान पोहचण्याची शक्यता असता. तसेच चुकीच्या पोस्चरमुळे हर्नियाचा होऊ शकतो. त्यामुळे योग्य पोस्चर ठेवणे गरजेचे आहे.
६) वजन उचलातना श्वासोच्छवास सुरू ठेवा
व्यायाम करताना श्वास रोखून ठेवणे चुकीचे आहे. असे करू नका. श्वासोच्छवास सुरू ठेवा. व्यायाम करताना श्वास आत आणि बाहेर काढत राहा. जलद श्वास घेऊ नका कारण याणे तुमच्या शरीरातील स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. वरील मुद्द्यांबरोबरच शरीराला अधिक ताण देऊ नका. आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञाशी संपर्क करा. वेळेत निदान झाल्यास तुमच्या जिवाला होणार धोका टळू शकतो.