नवी दिल्ली : सकाळी उठल्यानंतर अनेक जण गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. तहान भागविण्याबरोबर या पाण्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचा त्यांचा विश्वास आहे. परंतु काही जण याबाबत साशंक आहेत. गरम पाण्यामुळे मूत्रिपडाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते, हे खरे असले तरी गरम केलेले पाणी कोमट झाल्यानंतर पिणे हे अधिक हितकारी आहे, असे ‘वेदमृत’च्या संस्थापक डॉ. वैशाली शुल्का यांचे म्हणणे आहे. सुंठ टाकलेले एक कप गरम पाणीही शरीरासाठी उपयुक्त आहे. हे पाणी सकाळी किंवा न्याहारी आणि दुपारच्या भोजनादरम्यानही घेऊ शकता, असाही डॉ. शुल्का यांचा दावा आहे. अन्य काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा सुधारते. बद्धाकोष्टतेची समस्याही दूर होते. तर, काही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गरम आणि सामान्य तापमानाच्या पाण्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फारसा फरक नाही. परंतु सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे हे आरोग्यासाठी नक्कीच लाभदायी आहे.