पांढरा भात आवडीने खाणारे लोक एकप्रकारे आपल्या आरोग्याशी खेळत आहात. वास्तविक, रोज पांढरा भात खाल्ल्याने तुम्हाला अनेक मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचे बीपी तर वाढू शकतेच पण तुम्हाला मधुमेह आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, पांढऱ्या तांदळामुळे तुमचे आरोग्य कसे बिघडू शकते.

वजन वाढण्याचा धोका

जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर तुम्हाला पांढरा भात खाणे ताबडतोब बंद करावे लागेल. कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी ताबडतोब पांढऱ्या तांदळापासून दूर राहावे.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या वाढू शकते

पांढरा भात खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे महिन्यातून एकदाच पांढरा भात खाण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही मेटाबॉलिक समस्या टाळू शकता.

हृदयविकाराचा धोका वाढेल

तांदळात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले कोणतेही पोषक तत्व नसतात. त्यामुळे तुम्ही जर रोज भात खात असाल तर काळजी घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित जानेवारी २०१५ च्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की जास्त भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या जास्त वापरावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader