Cardamom Honey Benefits in Marathi: स्वयंपाकघरातील वेलचीला मसाल्याची राणी म्हणून ओळखले जाते. सणावाराच्या दिवसांत वेलचीचा गोडाच्या पदार्थात अगदी हमखास वापर केला जातो. मात्र, स्वयंपाकघरातील छोट्याशा वेलचीचे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील खूप फायदे आहेत. वेलचीमध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरससारखे घटक असतात, जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. तर दुसरीकडे आपल्या आरोग्यासाठी मधाचे फायदे चांगले आहेत. चवीला गोड मध आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करू शकतो. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. मधामध्ये दाहक-विरोधी, औषधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोगांवर मात करता येते. याशिवाय हे अनेक प्रकारे फायदेशीरदेखील असू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध आणि वेलची या दोन्हींचा आयुर्वेदात अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी वापर केला गेला आहे. दोन्ही शरीरातील वात-पित्त-कफची स्थिती संतुलित करण्यास मदत करतात आणि अनेक रोग टाळतात. वास्तविक जेव्हा तुम्ही मध आणि वेलचीचे सेवन करता, तेव्हा ते पोटात पाचक एन्झाईम्स वाढवते आणि नंतर शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. याशिवाय हे दोन्ही त्वचेच्या अनेक समस्या टाळण्यास मदत करू शकतात. याशिवाय या दोघांचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. चला, जाणून घेऊया या दोघांचे सेवन करण्याची पद्धत आणि मग त्याचे फायदे.

(हे ही वाचा : मध, गूळाच्या सेवनाने ब्लड शुगर होईल कमी? डायबिटीज रुग्णांना तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला )

सकाळी रिकाम्यापोटी वेलची, मध कसा घ्यावा?

तुम्हाला फक्त एक चमचा मध घ्यायचा आहे आणि त्यात दोन ते तीन वेलची बारीक करून त्याची पावडर करून आणि ते मधात मिसळून खायचं आहे. यासोबत एक ग्लास कोमट पाणी प्या. हे चयापचय गतिमान करते आणि आतड्यांसंबंधी हालचाल वेगवान करते, ज्यामुळे शरीरातील डिटॉक्स होण्यास मदत होते.

सकाळी रिकाम्यापोटी मध आणि वेलची सेवनाचे फायदे

  • सकाळी रिकाम्यापोटी मध आणि वेलचीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम होते. याशिवाय हे पोट साफ करण्यास मदत करते आणि यकृताच्या कार्यास गती देते. याशिवाय या दोघांच्या सेवनाने बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात आणि पोट साफ होते. याशिवाय वजन कमी करण्यातही हे उपयुक्त आहे. त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही हे सकाळी रिकाम्यापोटी घेऊ शकता.
  • सकाळी रिकाम्यापोटी मध आणि वेलचीचे सेवन केल्यास त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करणारे म्हणून काम करते आणि रक्तातील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि मग आपल्याला चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते. याशिवाय ब्लॅकहेड्स दूर करण्यातही हे उपयुक्त आहे, त्यामुळे सुंदर त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही या टिप्सचा अवलंब करू शकता.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips cardamom honey benefits at empty stomach in marathi pdb