आजकाल वजन वाढण्याची सामान्य अतिशय सामान्य झाली आहे. मात्र यामुळे मधुमेह, हृदयविकार असे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. म्हणूनच वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे भिजवलेले पाणी पितात. आयुर्वेदामध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. ते फायबर, लोह, जीवनसत्त्वे ए आणि डी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. या बियांचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, काही लोकांना मेथीचे पाणी पिल्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झाल्याचे दिसते. मेथीचे दाणे भिजवलेले पाणी प्यायल्यामुळे काय नुकसान होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

  • मेथीचे पाणी प्यायल्यानंतर काहींना अपचनाचा त्रास होतो. हे पाणी प्यायल्याने आतड्यात असलेले बॅक्टेरिया गॅस बनवू लागतात. त्यामुळे ही समस्या उद्भवते.
  • रिपोर्ट्सनुसार, गर्भवती महिलांनी मेथीचे पाणी पिणे टाळावे. यामुळे गर्भपात होऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करा.
  • आहारात मेथीचा कमी प्रमाणात समावेश केल्यास कोणतेही मोठे नुकसान होत नाही, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.
  • बियांच्या कडूपणामुळे, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे त्रासदायक ठरू शकते. तसेच मेथीच्या चहामध्ये अधिक मेथी टाकल्याने लूज मोशन होऊ शकते.
  • रिपोर्ट्सनुसार, मेथीचे पाणी घेतल्यावर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच मेथीचे पाणी प्यावे.

Photos : वयाच्या चाळीशीनंतर वाढतो डोळ्यांच्या ‘या’ आजारांचा धोका; वेळीच घ्या काळजी

  • मेथी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित आणि कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही आधीच मधुमेहावर औषधोपचार करत असाल तर मेथीचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
  • मेथीच्या सेवनामुळे ग्लुकोजची पातळी अपेक्षित मर्यादेपेक्षा कमी होऊ शकते. मेथीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र त्याचे प्रमाण योग्य असावे.
  • याशिवाय मधुमेह, गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्यांना मेथीच्या पाण्याची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेथीचे पाणी पिण्यास सुरुवात करावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)