मधुमेहाच्या रुग्णांनी साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. योग्य आणि पोषक आहार घेतल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी नेमक्या कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा याची माहिती बऱ्याच जणांना नसते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नसणाऱ्या पदार्थांचे सेवन जर त्यांनी केले तर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा जाणून घेऊया.

१. अंडी

रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Modak Recipe Modak without Mold Talniche modak recipe in marathi
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Mental patient suffer with lack of treatment due to shortage of manpower mumbai news
आरोग्य विभागाच्या मानसिक उपक्रमांनाच ‘मानसिक आधाराची’ गरज!
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
What happens to the body if you include turmeric in your diet for 2 weeks straight
रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा….

अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. तसेच अंडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अंडी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत.

२. रताळे

रताळ्यामध्ये मधुमेहावर गुणकारी कर्बोदके (कार्ब) असतात. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये ४ ग्राम फायबर आणि विटामिन सी असते.

Diabetes Tips : मधूमेहाच्या सीमारेषेवर आहात? वेळीच सावध व्हा! काय काळजी घ्यावी जाणून घ्या

३. मासे

सालमन, हेरिंग, सार्डिन, मैकेरल, ट्राउट आणि ट्यूना या प्रकारचे ओमेगा ३ मुबलक प्रमाणात असलेले मासे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तसेच याने दृष्टी देखील सुधारते.

४. पालक

पालक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अशा पालेभाज्यांमध्ये पॉलीफेनोल आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

५. एवोकॉडो

एवोकॉडो हे फळ रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित करून इन्सुलिन स्पाइसला कमी करण्यास मदत करते. परंतु या फळात कॅलरीज जास्त असतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

६. शेंगा आणि डाळी

शेंगा आणि डाळींचा रोजच्या आहारात जास्तीत जास्त वापर करावा. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Weight loss : जेवणाची वेळ वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या

७. दही

दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळते तसेच कार्बोहायड्रेटचे प्रमाण यामध्ये कमी असते. दही खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, तसेच दही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये दह्याचा समावेश करावा. परंतु दही खाताना त्यात साखर टाकणे टाळावे.

८. बेरी

बेरी हे फळ नैसर्गिकरित्या गोड असते. तसेच यात असणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. त्यामुळे हे फळ खाण्याचा सल्ला मधुमेहाच्या रुग्णांना दिला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या.)