काहींना सकाळी उठल्यावर लगेच अंघोळ करायची सवय असते. सकाळी अंघोळ केल्याशिवाय त्यांना फ्रेश वाटत नाही. तर काही जण वेळ मिळेल तेव्हा अंघोळ करतात. बऱ्याच जणांना रात्री आंघोळ करायची सवय असते. पण रात्री अंघोळ करणं शरीरासाठी योग्य की अयोग्य या विचारात ते असतात. त्यामुळे रात्री अंघोळ करावी की नाही आणि त्याचे फायदे तसेच तोटे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
रात्री अंघोळ केल्याचे फायदे
दिवसभराच्या कामानंतर कोणत्याही व्यक्तीला रात्रीच्या वेळी जास्त थकवा किंवा सुस्ती जाणवते, यामुळेच डॉक्टर अशा लोकांना रात्री अंघोळ करण्याचा सल्ला देतात. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली तर दिवसभर शरीरावर लागलेली धूळ आणि माती देखील निघून जाते. यासोबतच त्वचेचा रंग उजळतो. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने व्यक्तीचा मूडही सुधारतो आणि डोक्यात नवीन आणि चांगले विचार येतात.
रात्री अंघोळ केल्याने होणारे नुकसान
खरं तर रात्री अंघोळ करावी की नाही हे हवामानावर अवलंबून असते. जर खूप थंडी असेल तर रात्री अंघोळ केल्याने त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये, यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री अंघोळ करावी की करू नये, याबद्दल कोणताही नियम नाही. फक्त रात्री अंघोळ करण्यापूर्वी पाण्याचे तापमान आणि हवामान या दोन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर तिने रात्री अंघोळ करणे टाळावे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)