Energy Boosting Foods : दैनंदिन कामं करण्यासाठी शरीरात ऊर्जेची गरज असते. त्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला आहाराकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे कधीकधी आपल्याला दिवसभर अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. यासाठी योग्य आणि पुरेसा आहार घेणे गरजेचे आहे. काम करताना थकवा जाणवणे, दिवसभर आळस येणे, सतत अशक्तपणा जाणवणे, कोणत्याही कामात मन न लागणे ही सर्व शरीरात ऊर्जेची कमतरता असण्याची लक्षणे आहेत.
शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. त्यातही काही असे पदार्थ आहेत जे शरीरला त्वरित ऊर्जा देतात. जे खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उत्साहात सर्व कामं करू शकता, तसेच तुम्हाला जाणवणारा थकवा देखील दूर होतो. शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया.
Health Tips : दररोज केळी खाल्याने शरीरात होतात ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल
त्वरित ऊर्जा देणारे पदार्थ
१. केळी
त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये केळ्यांचा समावेश करा. केळी सर्वांनाच आवडतात. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर केळी खा, त्यामुळे नक्कीच फायदा मिळेल.
२. कॉफी
कॉफीचा समावेश एनर्जी ड्रिंकमध्ये केला जातो. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही कॉफी पिऊ शकता. कॉफीमुळे अशक्तपणा कमी होऊन, काम करण्याचा उत्साह वाढेल. कॉफी प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते, म्हणून कॉफीला ऊर्जेचे स्रोत मानले जाते.
३. ब्राऊन राईस
अशक्तपणा जाणवत असल्यास तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता. ब्राऊन राईसमध्ये पोषक तत्व असतात जी शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर ब्राऊन राईसचा आहारात समावेश करा.
४. रताळे
त्वरित ऊर्जा मिळवायची असेल तर रताळ्याचे सेवन करावे. रताळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत रताळे सर्वांनाच आवडतात. त्यामुळे रोजच्या आहरात देखील याचा समावेश करण्यास हरकत नाही. रताळे खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते.
Diabetes Tips : मधूमेहाच्या सीमारेषेवर आहात? वेळीच सावध व्हा! काय काळजी घ्यावी जाणून घ्या
५. खजूर
खजूर खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तुम्ही दिवसभरात ४-५ खजूर खाऊ शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)