पावसाळ्यात गरमागरम मका खाणे प्रत्येकालाच आवडते. हे चविष्ट तर असतेच, सोबतच निरोगी आरोग्यासाठीही हे गुणकारी आहे. मक्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, कॅरोटोनॉइड इत्यादी तत्त्व असतात. आपण वेगवेगळ्या प्रकारे मक्याचे सेवन करू शकतो. आज आपण जाणून घेऊया, पावसाळ्यात मका खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात.

पावसाळ्यात मका खाण्याचे फायदे

  • पाचनतंत्र सुधारते

पावसाळ्यात मक्याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात. मक्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. याचे सेवन केल्यास पावसाळ्यात पोटदुखी, अपचनाची समस्या, गॅस आदी त्रास होत नाहीत. खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मका फायदेशीर मानला जातो.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • प्रतिकारशक्ती वाढते

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने लोक आजारांना बळी पडतात. पावसाळ्यात मक्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मका खाल्ल्याने रोगप्रतिकारक पेशी मजबूत होतात. म्हणूनच तुम्ही रोज मक्याचे सेवन करू शकता.

  • त्वचा निरोगी राहील

पावसाळ्यात त्वचेवर पुरळ आणि लालसरपणाची समस्या वाढते. या दरम्यान तुम्ही मक्याचे सेवन करावे. मक्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेची दुरुस्ती होते.

मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; ‘ही’ लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका

आपण मका वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकतो. पावसाळ्यात बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उकडलेले मक्याचे दाणे, भाजलेला मका मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. त्याचप्रकारे आपण मक्याच्या दाण्यांचा सूप, सँडविच, भाज्यांमध्येही समावेश करू शकतो. मका आपल्या निरोगी आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेच, पण त्याचबरोबर त्याचा समावेश केल्याने पदार्थाची चवही वाढते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader