लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. याशिवाय आजकाल केवळ प्रौढच नाही तर लहान मुलेही फोनचा अधिक वापर करतात. या गोष्टींच्या अतिवापराने डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. वर्क फ्रॉम होममुळे या गोष्टींचा वापर खूप वाढला आहे. स्क्रीन दीर्घकाळ पाहिल्याने डोळ्यात जळजळ, पाणी येणे, अंधुक दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता.
- गाजर :
बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. गाजरात या दोन्ही गोष्टी असतात. अशा परिस्थितीत गाजराचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. हे दृष्टी वाढवण्याचे काम करते.
- हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. हे डोळ्यांसाठी खूप चांगले आहेत. त्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. हिरव्या भाज्यांमध्ये पालक आणि ब्रोकोली इत्यादींचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये भरपूर लोह असते. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील कार्य करतात.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
- नारिंगी आणि लाल फळे आणि भाज्या :
नारिंगी आणि लाल फळे आणि भाज्या जसे की लाल मिरची, संत्री, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली आणि किवीमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. हे मोतीबिंदू किंवा डोळ्यांशी संबंधित इतर समस्या टाळण्यास मदत करते.
- चिया आणि अळशीच्या बिया :
चिया बिया आणि अळशीच्या बिया डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते ओमेगा-३ अॅसिडमध्ये समृद्ध आहेत. ते व्हिटॅमिन ईचे देखील चांगले स्त्रोत आहेत.
- सुका मेवा :
सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. ते केवळ आरोग्यासाठीच नाही तर डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहेत. तुम्ही तुमच्या आहारात काजू, अक्रोड आणि बदाम यांचा समावेश करू शकता. ते ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध आहेत.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)