खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात लसणाचा वापर हमखास केला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरात दररोज वापरला जाणारा लसूण आरोग्यासाठीही गुणकारी आहे हे अनेकांना माहित नसते. लसणामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांवर हे औषध मानले जाते. लसणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच हे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg इतका असतो. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. यावर लसूण खाणे कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Indrayani serial shooting is going on in the cold of Nashik
‘इंद्रायणी’ मालिकेचं नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे शूटिंग, अनुभव सांगत सांची भोईर म्हणाली, “थंडीमुळे दातखीळ….”
Bharatiya Suvarnakar Samaj carried out census of 1200 houses in Indiranagar
सुवर्णकार समाजाचा नाशिक जिल्ह्यात खानेसुमारीचा संकल्प, शहरातील काही भागात पाच हजार जणांची माहिती संकलित
Incentive Allowance anganwadi sevika
‘लाडक्या बहिणी’ जमविणाऱ्या ‘ताई’च उपेक्षित!
Sanjeev Abhyankar, Sanjeevan Samadhi Sohala, Mahasadhu Shree Moraya Gosavi Maharaj Sanjivan Samadhi Mandir, pimpari,
पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
Start your day with theory of shake it off
Stress Reliever : तणाव दूर करण्यासाठी ही थिअरी करेल तुम्हाला मदत; दिवसातून दोन ते तीन मिनिटे करा ‘ही ‘गोष्ट, वाचा, डॉक्टरांचे मत
alyse ogletree, Breast Milk , newborn baby
अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे

आणखी वाचा : ‘या’ भाज्या करतात High Blood Pressure नियंत्रित ठेवण्यासाठी मदत; लगेच करा आहारात समावेश

लसणाचे आरोग्याला होणारे फायदे

  • दररोज सकाळी नियमितपणे कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
  • हिवाळ्यात अनेक आजार पसरतात, यावेळी वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते. यासाठी लसूण खाणे फायदेशीर ठरू शकते.
  • लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच लसणामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म आढळतात, जे इन्फेकशनपासून सुरक्षा करण्यास फायदेशीर मानले जातात.
  • जेवणामध्ये जंक फूडचा भडीमार, त्यामुळे वाढणारे वजन यांमुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतो. यामुळे आरोग्याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. यासाठी लसूण फायदेशीर मानले जाते. यासह लसणामुळे मेटाबॉलिजम सुधारण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader