उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. याचे कारण ताण आणि खराब जीवनशैली आहे. हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचवण्याचे काम करते. जर हा दबाव वाढला तर उच्च रक्तदाब होतो आणि जर दबाव कमी झाला तर कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. मात्र, तुम्ही घरच्या घरी काही पद्धतींचा अवलंब करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  • नियमित व्यायाम

नियमित व्यायाम करणे हा उच्च रक्तदाब कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे व्यायाम करता तेव्हा तुमचे हृदय मजबूत होते आणि रक्त पंप करण्यात अधिक कार्यक्षम बनण्यास मदत करते ज्यामुळे तुमच्या धमन्यांमधील दाब कमी होतो. खरं तर, १५ मिनिटांचा मध्यम व्यायाम, केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

तुम्हालाही श्वास घेण्यास त्रास होतो का? असू शकते हृदयविकाराचे प्राथमिक लक्षण; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

  • श्वासोच्छवासाचे व्यायाम

तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर दीर्घ श्वास घ्या. सुमारे दोन सेकंद आपला श्वास रोखून ठेवा, नंतर हळूहळू श्वास सोडा. काही क्षण थांबा आणि पुन्हा करा. हा व्यायाम पुन्हा-पुन्हा करा. तुम्हाला लगेचच तुमच्या स्थितीतील फरक दिसेल. श्वासोच्छवासाच्या व्यायामाद्वारे देखील रक्तदाब सामान्य केला जाऊ शकतो.

  • गरम पाण्याने अंघोळ करा

गरम पाण्याने अंघोळ करणे हा एक मार्ग आहे जो तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येतून त्वरित आराम देऊ शकतो. कमीतकमी १५ मिनिटे शॉवरमध्ये रहा आणि गरम पाण्याचा आनंद घ्या. हे स्नायूंचा ताण कमी करण्यास देखील मदत करू शकते.

Health Tips : शरीरात ‘या’ कमतरता निर्माण झाल्यावर निर्माण होते गोड खाण्याची इच्छा; वेळीच सावध व्हा

  • आराम करा

रक्तदाबाचे प्रमुख कारण तणाव आहे, म्हणून रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी स्वतःला आराम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर तणाव कमी करण्यासाठी योगदान देणाऱ्या काही अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. उदाहरणार्थ, काही क्षण शांत खोलीत बसा किंवा एखादे चांगले पुस्तक वाचा, संगीत ऐका किंवा ध्यान करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)