चिंच हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याच्या पानांचा चहा देखील फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. आता तुम्ही विचार करत असाल की चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवला जातो आणि त्यातून कोणते फायदे मिळतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत हा चहा खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया या चहाचे फायदे काय आहेत.
- चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. अशावेळी हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात हे सर्वांनाच माहीत आहे, पहिले चांगले आणि दुसरे वाईट. जर शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढले तर हृदयाशी संबंधित समस्या सुरू होतात. अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा प्यावा.
Photos : सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरतात. बहुतांश लोकांना वजन कमी करायचे असते. ज्यांनी आतापर्यंत विविध पद्धतींचा अवलंब केला, परंतु त्यांना काहीच उपयोग झाला नाही अशांना चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करायचे असेल तर चिंचेचा चहा नियमित प्या.
- चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास प्रभावीपणे मदत करते. यासोबतच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, जे तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.
- चिंचेच्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व पाचक रसांना उत्तेजित करतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. म्हणजेच या चहाचे सेवन केल्यास पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते. या चहाचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)