Food For High BP : उच्च रक्तदाबाची स्थिती हृदयासह मेंदूच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी औषध वेळेवर घेण्यासह आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. काही काळापुर्वी उच्च रक्तदाबाची समस्या केवळ जेष्ठ मंडळींमध्ये आढळून येत असे. परंतु आता युवा पिढीदेखील या आजाराला बळी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर सुरूवातीच्या काळात याची लक्षणे प्रभावीपणे दिसुन येत नाहीत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असते. यासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. पालक, मेथी, कांद्याची पात यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

Weight loss : जेवणाची वेळ वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या

बीट

बीटामध्ये नायट्रिक ऑक्साईड भरपूर प्रमाणात आढळते. हे रक्तवाहिन्यांना अधिक कार्यशील करून रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

साय नसलेले दुध आणि दही

साय नसलेल्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण कमी होते. तसेच दुध कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. एका रिसर्चनुसार ज्या महिला एक आठवड्यात पाच पेक्षा अधिक वेळा दह्याचे सेवन करतात, त्यांना उच्च रक्तदाब होण्याची समस्या २० टक्क्यांनी कमी होते.

केळी

केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आढळते. याशिवाय केळ्यांमध्ये कॅल्शियमदेखील असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Diabetes Tips : मधूमेहाच्या सीमारेषेवर आहात? वेळीच सावध व्हा! काय काळजी घ्यावी जाणून घ्या

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये ६०% कोको असते. तसेच डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत साखरचे प्रमाण कमी असते. याच्या नियमित सेवनाने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजरांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)