शरीरात सर्व पोषक घटकांचे आपापले महत्त्व असले तरी यापैकी एकाही पोषक तत्वाची कमतरता असेल तर शरीरात समस्या निर्माण होऊ लागतात. व्हिटॅमिन डी हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे सहसा सूर्यप्रकाशाद्वारे मिळते, तसेच ते काही खाण्यायोग्य पदार्थातही असते. त्याला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. त्वचा खराब होईल म्हणून अनेकजण सूर्यप्रकाश टाळायच्या प्रयत्नात असतात. मात्र हाच सूर्यप्रकाश आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करतो.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हाडे आणि दात कमकुवत होऊ लागतात. या पोषक तत्वांची कमतरता असताना आपले शरीर कोणत्या प्रकारचे धोक्याचे संकेत देते ते जाणून घेऊया.
आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे दुष्परिणाम
- हाडे दुखणे
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डीचीही गरज असते. जर या पोषक तत्वाची कमतरता असेल तर कॅल्शियम योग्यरित्या शोषले जाऊ शकत नाही. यामुळे, हाडे, दात आणि शरीरात तीव्र वेदना होतात आणि नंतर तुम्हाला अधिक थकवा जाणवू लागतो.
- दुखापत किंवा जखम बरी होण्यास वेळ लागणे
सामान्यतः दुखापत झाली तर ती देखील काही दिवसात बरी होते, परंतु जर वेदना कमी होण्यास सामान्यपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर समजून जा की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. हे एक पोषक तत्व आहे जे जळजळ आणि सूज टाळण्यास मदत करते.
- मानसिक आरोग्यावर परिणाम
जेव्हा आपले मन पूर्णपणे निरोगी असेल तेव्हाच आपले शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. जर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर तुम्ही नैराश्याला लवकर बळी पडू शकता. अनेक ध्रुवीय देशांमध्ये, तब्बल सहा महिने सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अशावेळी तिथल्या लोकांना अनेकदा तणाव जाणवतो. वास्तविक सूर्यप्रकाश आपला मूड सुधारण्याचे काम करतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)