बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण कमी वयातच वेगवेगळ्या आजरांना बळी पडत आहेत. त्यामुळे तरुणाईचा कल फिट राहण्याकडे, वजन नियंत्रित ठेवण्याकडे वाढला आहे. यासाठी अनेकजण नियमितपणे व्यायाम करतात, जिमला जातात. परंतु व्यायाम केल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. व्यायामादरम्यान शारीरिक हालचाल जास्त होते, अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी काहीजण क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात. यांमुळे जास्त थकवा जाणवू शकतो. या थकव्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही पेयं तुम्हाला मदत करू शकतात. कोणती आहेत ती पेयं जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यायामानंतर शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या पेयांचे सेवन करा

लिंबू सरबत
उष्णतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. यासाठी व्यायामानंतर लिंबू सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात पाण्याची पातळी योग्य राहण्यास मदत मिळते.

नारळाचे पाणी
नारळाच्या पाण्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, तर इलेक्ट्रोलाईट्स, पोटॅशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे व्यायामानंतर जाणवणारा थकवा घालवण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

आणखी वाचा : गरम जेवण फ्रिजमध्ये ठेवल्यावर काय होते? फ्रिज वापरताना ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

ताक
ताक शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे व्यायामानंतर जाणवणारा थकवा घालवण्यासाठी तुम्ही ताक पिऊ शकता.

कलिंगडाचा रस
कलिंगडाच्या रसामध्ये ॲमिनो ॲसिड आढळते, जे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे व्यायामानंतर येणारा थकवा देखील दुर होण्यास मदत होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)