कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाय करून पाहिलेल्या रुग्णांसाठी आंब्याची कोय अतिशय गुणकारी ठरू शकते. आंब्याच्या कोयीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण जाणून घेऊया कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासोबतच आंब्याच्या कोयीचे इतर फायदे काय आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोटासंबंधित त्रास दूर होतात :

केवळ आंबाच नाही, तर त्याची कोय देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या कोयीचे सेवन केले तर ते तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळेल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही आंब्याची कोय खूप फायदेशीर आहेत.

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात का? हे दोन उपाय करा आणि चेहऱ्यावरील चिकटपणा घालवा

रक्तातील साखर नियंत्रणात राहते :

मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याच्या कोयीचे सेवन करावे. याच्या सेवनाने तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची कोय खूप फायदेशीर आहे.

आंब्याच्या कोयीचे इतर फायदे :

  • मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी देखील तुम्ही आंब्याच्या कोयीचे सेवन करू शकता. यामुळे या काळात तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.

Health Tips : तुम्हीही कढईमध्ये उरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

  • हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठीही आंब्याची कोय खूप फायदेशीर आहे. हृदयरोग्यांनी ते जरूर खावे. वास्तविक, जेव्हा तुम्ही तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवता, तेव्हा हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • आंब्याची कोय दातांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते आणि सगळ्यांनाच माहित आहे की कॅल्शियम दातांच्या विकासात मदत करते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips mango seeds are also very useful cures many serious ailments pvp