आजकाल माणसाच्या जीवनशैलीमध्ये फरक पडला आहे. त्यामुळे या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही होत असतो. हल्ली प्रत्येकाचे काम लॅपटॉप, डेस्कटॉपवर असते. अनेकांना तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून काम करावे लागते. पण बहुतांश वेळ हा लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवर जात असल्याने डोळ्यांवर ताण येतो. लॅपटॉप स्क्रीन आपल्या डोळ्यांप्रमाणे डिझायन केलेल्या नसल्यामुळे त्याच्या सततच्या वापरामुळे थकवा, कोरडेपणा आणि डोकेदुखीची समस्या जाणवते. पण डोळे हा अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे.
आजच्या डिजिटल युगामध्ये स्क्रीन आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत आज प्रत्येकजण गॅजेट्सचा वापर करतात. स्क्रीनवर बराच वेळ घालवल्यामुळे लहान मुलांना कमी वयातच डोळ्यांसंबंधी आजार होतात. सूर्य बाजूला बदललेली जीवनशैली आणि मधुमेह. थायरॉईड सारख्या आजारांमुळे देखील डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. आज आपण अशी काही डोळ्याची योगासने पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढेल अणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिल. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.
हेही वाचा : पोटदुखी किंवा अॅसिडिटीचा त्रास होतोय? मग रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हाताचा पंजा उबदार म्हणजेच गरम होईपर्यंत एकमेकांवर घासून घ्यावा. हाताचे पंजे गरम म्हणजेच उबदार झाले की ते हळुवारपणे तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवावेत. असे केल्याने गरम उब पापण्यांना मिळते व तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. हा उपाय करून तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता.
२. डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी दुसरे एक योगासन आहे ते म्हणजे डोळे मिचकावणे. हा व्यायाम तसा सोपा आणि प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवून आरामात बसावे लागेल. त्यानंतर सलग १० वेळा वेगाने डोळे मिचकावावेट आणि २० सेकंद आपले डोळे बंद करावेत. यावेळी तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित ठेवावे. हा उपाय सुमरे ५ वेळा तरी करावा. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर येणार टॅन कमी करण्यासाठी हा उपाय करावा.
३. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी किंवा त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तिसरे योगासन आहे ते म्हणजे डोळे फिरवणे (Eye Rotation). आपले डोके न हलवता आपले डोळे घडाळ्याच्या दिशेने आणि नंतर उलट दिशेने ५ ते १० मिनिटे फिरवावेत. अशा प्रकारे डोळे फिरवल्याने डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता आणि रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)