किडनी म्हणजेच मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात हे अवयव मदत करते. त्याचबरोबर ते आपल्या शरीराला डिटॉक्सिफायही करते. जर आपली किडनी योग्यप्रकारे काम करत नसेल तर आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आजकाल, खराब जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे किडनीच्या समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्यांवर वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढू शकते. आज आपण किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आणि बचाव पद्धती याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन पद्धतीने किडनी खराब होण्याचा धोका असतो. पहिला म्हणजे एक्यूट किडनी फेल्युअर आणि दूसरा क्रॉनिक किडनी फेल्युअर. एक्यूट किडनी फेल्युअर झाल्यास मूत्रपिंडाचे कार्य तात्पुरते थांबते. असे झाल्यास त्यासाठी किडनी प्रत्यारोपण आणि डायलिसिसची गरज नाही. परंतु क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये मूत्रपिंड हळूहळू खराब होऊ लागते.

Photos : सामान्य वाटणाऱ्या डाळींचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? गंभीर आजाराशीही देतात जबरदस्त लढा

मूत्रपिंड का खराब होते?

बहुतेकवेळा लोक डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय पेनकिलर, अँटिबायोटिक्स यांचे सेवन करतात. यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. वाईट जीवनशैली, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हेदेखील किडनी निकामी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे

आपले मूत्रपिंड योग्य पद्धतीने काम करत नसल्यास शरीर आपल्याला काही संकेत देत असते. किडनी निकामी होत असताना आपल्याला शरीरात खालील लक्षणे दिसू शकतात.

  • लघवीचे प्रमाण घटणे
  • लघवी करताना रक्त येणे
  • श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे
  • थकवा जाणवणे
  • उलटी येणे
  • छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव जाणवणे
  • हृदयविकाराचा झटका येणे

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

मूत्रपिंडाचे नुकसान कसे टाळावे?

  • मूत्रपिंड निकामी होऊ नये म्हणून वर्षातून किमान एकदा लघवी आणि रक्ताच्या चाचण्या कराव्यात.
  • धूम्रपान आणि दारू पिणे टाळा.
  • सकस आणि पौष्टिक आहार घ्या.
  • दररोज भरपूर पाणी प्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)