‘व्हिटॅमिन डी’ शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्याचे काम करते. याशिवाय स्नायूंना काम करण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ची गरज असते. इतकच नाही तर व्हिटॅमिन डी मेंदूतील मेसेज शरीरात मज्जातंतूंद्वारे पोहोवण्याचेही काम करते, यामुळे रोग प्रतिकार मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते.
‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण पावसाळ्यात वातावरण ढगाळ वातावरण असल्याने सूर्य प्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी मिळवायचे कसे असा प्रश्न पडतो. अशावेळी पावसाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात तुम्ही ३ मोठे बदल करु शकता.
पावसाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरुन काढाल?
सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत सूर्याचे दर्शन अगदी क्वचितच होते, पण तंदुरुस्त राहण्यासाठी व्हिटॅमिन डीची दररोज गरज असते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डीची पूर्तता करण्यासाठी काही उपाय आहेत. ज्याचा अवलंब केला जाऊ शकतो.
- आहार
शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता आहारातून भरून काढता येते. यासाठी फॅटी फिश किंवा फिश ऑइलचा आहारात समावेश करा. याशिवाय काही पदार्थ असे आहेत की, ज्यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असते, पण पावसाळ्यात त्याचा खूप उपयोग होतो. यासाठी अंड्याचा पिवळा भाग, मशरूम आणि पनीर खा.
- सप्लिमेंट्स
जर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करू शकत नसाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स खाऊ शकतात.
- सप्लिमेंट्स केव्हा खायला हवे?
बरेच लोक कसलाही विचार न करता सप्लिमेंट्स घेणे सुरू करतात. पण तुम्हाला व्हिटॅमिन डीची गरज आहे की नाही हे आधी तपासणे गरजेचे आहे. यासाठी रक्त तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या अहवालात याची आवश्यकता नमूद केली असल्यास, तरीही सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि दिवसातून किती वेळा ते घेता येईल हे विचारा.
- व्हिटॅमिन डी हानिकारक आहे का?
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेणे हानिकारक ठरु शकते. रक्तातील व्हिटॅमिन डीच्या उच्च पातळीमुळे मळमळ, उलट्या, स्नायू कमकुवत होणे, वेदना, भूक न लागणे, डिहायड्रेशन, जास्त लघवी आणि तहान आणि किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.