हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्या पालेभाज्या उपलब्ध होत नाहीत, हिवाळ्यात मात्र सर्वत्र हिरव्या पालेभाज्या उपलब्ध होतात. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात मेथी आणि पालक या भाज्या प्रामुख्याने आढळतात. या भाज्यांमध्ये कोणते गुणधर्म आढळतात, या दोन्ही भाज्यांपैकी कोणती भाजी खाल्ल्याने शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते जाणून घ्या.

पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच पालक आयरनचे ही उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे आयरनची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. यासह आरोग्यासाठी फायदेशीर असणारे कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन के यांसारखे मिनरल्स, विटामिन्स आढळतात. बद्धकोष्टतेच्या समस्येवरही पालक फायदेशीर मानले जाते.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?

मेथी
मेथीच्या भाजीत अनेक मिनरल्स आणि विटॅमिन आढळतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी देखील मेथीची भाजी फायदेशीर मानली जाते. यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही याची मदत होते. मेथीची भाजी अशाप्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

आणखी वाचा : हिवाळ्यात मुलांना सतत सर्दीचा त्रास होतोय का? ‘हे’ घरगुती उपाय नक्की ठरतील फायदेशीर

मेथी आणि पालक यांमध्ये कोणती भाजी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते?

  • ज्या व्यक्तींना रक्त पातळ होण्याची समस्या आहे, त्यांनी पालक खाणे टाळावे. तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालक खाऊ नये.
  • जर तुम्ही लो कॅलरी डाएटवर असाल तर पालक ऐवजी मेथीच्या भाजीचा आहारात समावेश करा. मेथीमध्ये पालकच्या तुलनेत कमी कार्ब्स आढळतात. तसेच यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळते. १०० ग्रॅम मेथीमध्ये २.९ ग्रॅम कार्ब्स आणि ४ ग्रॅम प्रोटीन आढळते, तर १०० ग्रॅम पालकमध्ये ६ ग्रॅम कार्ब्स आणि २ ग्रॅम प्रोटीन आढळते. त्यामुळे मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.
  • मेथीमध्ये पालकपेक्षा जास्त कॅल्शियम आढळते, त्यामुळे मेथी खाणे हाडांसाठी फायदेशीर ठरु शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)