How to improve insulin resistance : आरोग्याची काळजी घेणे हे आपल्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आपल्याला माहीत आहे; पण त्यानुसार आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करतो का? किराणा दुकानात जाऊन जर आपण आरोग्यास हानिकारक ठरणारे पॅकेज किंवा प्रकिया केलेले पदार्थ निवडत असेल तर आपली निवड चुकत आहे. त्याऐवजी जर पोषकतत्व देणारे पदार्थ निवडले तर आपल्याला आरोग्य जपता येईल. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता यांनी १० अशा पदार्थांबाबत सांगितले, जे इन्सुलिन रेझिस्टन्सवर अत्यंत प्रभावी आहेत.

“तुमच्या किराणा मालाच्या यादीत या १० पदार्थांचा समावेश आहे का? हे पदार्थ खरेदी करून तुम्ही वेळ वाचवाल, पण त्याचबरोबर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यातही मदत होईल, असे गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Ayurveda for Diabetes
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…

हेही वाचा – द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान आठवड्यातील सहा दिवस १२ तास काम करीत होती प्रियांका चौप्रा! शरीरावर काय होतो परिणाम; तज्ज्ञ काय सांगतात….

रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासाठी पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता यांनी शिफारस केलेले १० पदार्थ

१) अक्रोड आणि बदाम सारखे नट्स
२) चिया बिया (सब्जाचे बी)
३) मिलेट्स जसे की कोडो (कोद्री), राजगिरा, नाचणी
४) खोबरेल तेल आणि तूप
५) अंडी, चिकन
६) दालचिनी, हळद
७) ट्यूना, सॅल्मन, मॅकेरलसारखे फॅटी मासे
८) बेरी
९) पालक, मेथी, कोबी, गाजर, ब्रोकोली, भोपळी मिरची यांसारख्या रंगीत भाज्या
१०) जवसाचे तेल

पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता यांनी शिफारस केलेले १० पदार्थ खरंच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करू शकतात का, याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊ या….

हेही वाचा – रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला

इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी हे पदार्थ उपयोगी आहेत का?

बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलमध्ये मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या वीणा व्ही यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. त्या म्हणाल्या,” हे पदार्थ रक्तातील साखरेची वाढ होत नाही म्हणूनच इन्सुलिन रेझिस्टन्सला तोंड देण्यासाठी मदत होते. ही अशी स्थिती आहे, जिथे शरीर इन्सुलिनच्या पातळीचे नियमन करू शकत नाही. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. हे पदार्थ हेल्दी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा भाग आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणदेखील असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक नसतात आणि त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होत नाही. त्याचबरोबर साध्या कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन टाळून त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त आणि कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेल्या पदार्थांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

“इन्सुलिन रेझिस्टन्सचे नियमन करणे हे अन्न किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खाल्ले जात आहे यावर अवलंबून असते. त्याचबरोबर व्यायाम आणि योगा अशा आरोग्यदायी गोष्टीदेखील पाळल्या पाहिजेत. हे पदार्थ इन्सुलिन रेझिस्टन्स नियमन ठेवण्यासाठी महत्त्वाचे असले तरी त्यांचा परिणाम कसा होईल, हे तुम्ही त्यांचा वापर कोणत्या पद्धतीने करत आहात आणि त्यांची गुणवत्ती कशी आहे यावर अवलंबून असते”, असेही वीणा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – तुम्हाला जीवनसत्वे बी समृद्ध आहाराची गरज का आहे? कोणत्या पदार्थांमधून मिळते B12 आणि B3? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

आरोग्यासाठी कसे ठरतात फायदेशीर

वीणा यांच्या मते, “पौष्टिक घटकांनी समृद्ध असे नट्स, बिया आणि पालेभाज्यांचे सेवन करणे हे चयापचयासाठी आवश्यक पोषक घटक पुरवते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स क्षमता नियंत्रित करते. खोबरेल तेल, तूप आणि मासे यांसारखे हेल्दी फॅट्स असलेल्या या पदार्थांमध्ये विशेषत: ओमेगा ४ फॅटी ॲसिड आहे, ज्यात दाहकता विरोधी गुणधर्म आहेत. हे फॅट्स दाहकता कमी करून इन्सुलिनची संवेदनशीलता (insulin sensitivity – तुमच्या पेशी इन्सुलिनच्या प्रभावांना किती प्रतिसाद देतात) सुधारू शकतात, ज्याचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्सबरोबर जोडला जातो. मिलेट्स, चिया बिया आणि भाज्या यांसारखे पदार्थ फायबरने समृद्ध असतात. फायबर रक्तातील साखरेचे शोषण कमी करते आणि रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ रोखते.”

वीणा यांच्या मते, अंडी आणि चिकन हे उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात. प्रथिनेयुक्त पदार्थांच्या सेवनाने तृप्ततेची भावना वाढते ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि अति सेवन टाळले जाते.

“संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत सकस पदार्थांचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे. अगदी निरोगी पदार्थांचेही अतिसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सची पातळी बिघडू शकतो,” असे वीणा म्हणाल्या.

Story img Loader