Benefits Of Gooseberry Amla In Winters: थंडीचा महिना आला की संत्री, स्ट्रॉबेरी यांच्या बरोबरीने रंगाचं व गुणधर्मांचं वैविध्य दाखवायला हिरवेगार आवळे सुद्धा बाजारात येतात. छान आंबट- तुरट चवीचे मोठे व छोटे आवळे मीठ मसाला लावून किंवा साखरेच्या पाकात घोळवून खायला अनेकांना आवडतात. खरंतर सर्वाधिक फायदे प्राप्त करण्यासाठी आवळ्याचे मीठ किंवा साखरेविना सेवन करणेच उत्तम ठरते मात्र आपापल्या आवडीनुसार अनेकजण प्रयोग करतात. आज आपण याच आवळ्याचे काही अगदी प्रभावी फायदे पाहणार आहोत. बंगळुरू-आधारित फिटनेस ब्रँड Cure.fit च्या पोषण प्रमुख चांदनी हलदुराई यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना सांगितले की, १०० ग्रॅम आवळ्यामध्ये सुमारे ६०० ते ७०० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते त्यामुळे तुम्हीही फायद्यांचा अंदाज लावू शकताच. तुमचा अंदाज योग्य की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी आज आपण तज्ज्ञांच्या माहितीनुसार १०० ग्रॅम आवळ्याचे पोषण प्रोफाइल पाहणार आहोत. तसेच आवळा कोणी खावा, किती खावा, त्याचे फायदे- तोटे याचाही आढावा घेऊया..

आवळ्याचे पोषण प्रोफाइल

हलदुराई यांच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम कच्च्या आवळ्याचे पोषण प्रोफाइल खालीलप्रमाणे:

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
  • कॅलरी: 44
  • कार्ब्स: 10.18 ग्रॅम
  • फायबर: 4.3 ग्रॅम
  • साखर: 4.4 ग्रॅम
  • प्रथिने: 0.88 ग्रॅम
  • फॅट्स: 0.58 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 600-700 मिलीग्राम प्रति 100 ग्रॅम
  • व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 आणि B5 सह),
  • कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज

आवळ्याचे आरोग्यदायी फायदे

रोग प्रतिकारशक्ती: आवळ्यामधील उच्च व्हिटॅमिन सी ऑक्सिडेटिव्ह तणावापासून पेशींचे संरक्षण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे विकारांचे संक्रमण थांबवता येऊ शकते. सामान्य सर्दी सारख्या आजारांचा कालावधी कमी करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी कामी येते. आवळ्यातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा घटक आणि दाहक-विरोधी गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.

मधुमेहावर नियंत्रण: आवळ्यामध्ये विरघळणारे फायबर असते जे शरीरातील साखरेचे शोषण कमी करते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि वाढ टाळण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, आवळ्याचा रक्तातील ग्लुकोज आणि लिपिड (चांगल्या कोलेस्ट्रॉल) च्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे आवळा टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतो.

पाचक आरोग्य: आवळ्यातील फायबर आतड्याच्या हालचालींचे नियमन करून आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या परिस्थितीशी संबंधित लक्षणे दूर करते. यामुळे निरोगी पचनास मदत होते. व्हिटॅमिन सी इतर पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते.

डोळ्यांचे आरोग्य: आवळा व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहे. वयानुरूप कमकुवत होणाऱ्या दृष्टीचा धोका टाळण्यासाठी आवळ्यातील व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण काम करते.

स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य: आवळ्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात जे मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सना नष्ट करतात. व्हिटॅमिन सी चे उच्च प्रमाण शरीराला नॉरपेनेफ्रिन, तयार करण्यास मदत करते, जे स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर असू शकते.

यकृताचे आरोग्य: याबाबत मानवामध्ये अधिक संशोधनाची गरज आहे मात्र, काही प्राण्यांवर झालेल्या अभ्यासानुसार आवळ्याचा रस यकृताचे कार्य सुधारू शकतो. आवळ्याचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म हे उच्च-फ्रुक्टोज किंवा उच्च फॅट्स युक्त आहारामुळे उद्भवणाऱ्या विकारांना आला घालतात. यामुळे चयापचयाचा वेग सुद्धा वाढू शकतो.

मधुमेही आवळा खाऊ शकतात का? (Can Diabetes Patients Ear Amla)

आवळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे रक्तात साखरेचे शोषण कमी होते. शिवाय इन्सुलिनची संवदेनशीलता सुधारण्यास मदत होते. हलदुराई सांगतात की, आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण ही स्थिती ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करू शकतात. मात्र मधुमेहींनी कोणत्याही पदार्थांच्या सेवनाआधी व नंतर रक्तातील साखरेची पातळी तपासून पाहायला हवी जेणेकरून तुमच्या शरीराला साजेसे आहे का हे स्पष्ट होईल. मात्र आवळ्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते त्यामुळे आपण किती प्रमाणात आवळ्याचे सेवन करता याकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे.

गर्भवती महिला आवळ्याचे सेवन करू शकतात का? (Pregnancy Amla Benefits)

हलदुराई यांनी नमूद केले की आवळा गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत आहे, जो बाळाच्या रोगप्रतिकारक शक्ती, हाडे आणि दात यांच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि लोह शोषण्यास मदत करतो. आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात आणि त्यातील फायबर गर्भधारणेत जाणवणाऱ्या सामान्य पाचन समस्या दूर करू शकतात. तथापि, संयम महत्वाचा आहे, कारण जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता सुद्धा जाणवू शकते.

हे ही वाचा<< १२१ किलोच्या इन्फ्लुएन्सर तरुणीने पालटलं रूप; ४० किलो वजन कमी करतानाचा डाएट व ‘चीट डे’ ची हॅक केली शेअर 

हलदुराई यांनी आवळ्याच्या संबंधित काही समज- गैरसमज दूर केले आहेत.

गैरसमज 1: आवळा मधुमेह बरा करू शकतो.
खरं काय? – आवळा मधुमेहींच्या आहारात उपयुक्त ठरू शकतो, परंतु तो मधुमेह बरा करू शकत नाही.

गैरसमज 2: आवळा कर्करोग टाळू शकतो किंवा बरा करू शकतो.
खरं काय?- आवळ्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म कर्करोगासह काही रोगांचा धोका कमी करण्यात मदत करू शकतात, मात्र लक्षात घ्या आवळा कर्करोग टाळू किंवा बरा करू शकत नाही.

Story img Loader