100 Gram Onion Nutrition: कांदा रडवतो, कधी कधी कांद्याचे भाव तर आकाशाला भिडत असतात, कांदा खाल्ल्यावर ब्रश करण्याचं काम वाढतं, अशा एक ना अनेक तक्रारी असूनही आजवर कांदा हा आपल्या आहारातून बाजूला कसा फेकला गेला नाही? कधी हा विचार केला आहेत का? आजच्या हेल्थ स्पेशलमधील ही माहिती यावर सविस्तर उत्तर देऊ शकते.

केअर हॉस्पिटल्स, भुवनेश्वर येथील वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांनी १०० ग्रॅम कांदा आपल्या शरीरात नेमके काय बदल घडवून आणू शकतो आणि कोणती पोषक सत्व पुरवतो याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. कांदा हा अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहेच त्यासह यात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. जगभरातील कांद्याची मुबलक उपलब्धता पाहिल्यास हा आहाराचा एक मुख्य भाग बनला आहे. मधुमेही, गर्भवती महिला व तुम्हा- आम्हा सगळ्यांनाच कांद्यातून काय फायदे मिळतात याची ही सविस्तर आकडेवारी…

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

१०० ग्रॅम कांदा म्हणजे…

  • कॅलरीज: 50
  • एकूण फॅट्स : 0.1 ग्रॅम
  • सोडियम: 4.0 मिलीग्राम
  • कार्बोहायड्रेट: 11.1 ग्रॅम
  • फायबर: 1.6 ग्रॅम
  • साखर: 4.2 ग्रॅम
  • प्रथिने: 1.2 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 11 मिलीग्राम
  • व्हिटॅमिन बी 6: 0.1 मिलीग्राम
  • फोलेट: 6.0 मायक्रोग्राम
  • मॅग्नेशियम: 16 मिलीग्राम
  • पोटॅशियम: 127 मिलीग्राम

कांद्याचे आरोग्यासाठी फायदे (Onion Health Benefits)

1) अँटिऑक्सिडंट्स: कांद्यामध्ये क्वेर्सेटिनसह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यात दाहक-विरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

2) हृदयासाठी उत्तम: कांद्यामधील फ्लेव्होनॉइड्स आणि सल्फर कोलेस्टेरॉलची पातळी सुधारून तसेच रक्तदाब कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

3) रोगप्रतिकारक शक्ती: कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

4) कर्करोगविरोधी क्षमता: काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की कांद्यामधील गुणधर्म कर्करोगाशी लढण्यास मदत करू शकतार विशेषतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि प्रोस्टेट कर्करोगात याचा फायदा होऊ शकतो.

डायबिटीस रुग्ण कांदा खाऊ शकतो का? (Diabetes & Onion)

मधुमेहाचे रुग्ण संतुलित आहाराचा भाग म्हणून कांद्याचे सेवन करू शकतात. कांद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि कांद्यामुळे शरीराला फायबर मिळते तसेच. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. मात्र कांद्यातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण पाहता सेवन विचारात घेणे महत्वाचे आहे. तसेच कांद्याच्या सेवनानंतर व आधी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण केले पाहिजे.

कांदा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का? (Onion & Pregnancy)

कांद्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असल्याने सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र आजारांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे महत्वाचे आहे.

कांदा खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

1) ऍलर्जी: काही व्यक्तींना कांद्याची ऍलर्जी असू शकते. तुम्हाला ऍलर्जी माहीत असल्यास किंवा वारंवार दिसू लागल्यास सेवन त्वरित थांबवा शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

2) साखरेचे प्रमाण: कांद्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते, परंतु त्यांच्यातील फायबर सामग्रीमुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर त्यांचा एकंदर परिणाम कमी होतो, मात्र तुम्हाला ब्लड शुगरचा कितपत त्रास आहे यानुसार सेवनाचे प्रमाण निश्चित करा.

हे ही वाचा<< बोटं मोडल्याने आर्थराइटिस होतो का? पुढच्या वेळी आळस देताना ‘हे’ मुद्दे लक्षात घ्या

3) कांद्यात पोटॅशियम असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पण उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास/सोडियमच्या इतर स्त्रोतांवर नियंत्रण ठेवायला हवे. जास्त सोडियम उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकतो.