लसूण जगभरातील स्वयंपाकघरांमधला मुख्य पदार्थ आहे. भाज्या किंवा इतर पाककृतींमध्ये लसूण टाकली, तर पदार्थाची चवसुद्धा वाढते. पण, आपल्या आवडत्या पदार्थांचा स्वाद वाढविण्याच्या क्षमतेच्या पलीकडे लसणात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हजारो वर्षांपासून पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाणारी लसूण आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर ठरते आहे. तर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. लसूण तुमची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि जळजळ कमी करण्यासही मदत करते.

डॉक्टर एकता सिंघवाल यांनी सांगितल्याप्रमाणे १०० ग्रॅम कच्च्या लसणामध्ये अंदाजे खालील पोषक घटक असतात…

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

कॅलरी – १४९ kcal
कर्बोदके – ३३.०६ ग्रॅम
फायबर – २.१ ग्रॅम
साखर – १ ग्रॅम
प्रथिने – ६.३६ ग्रॅम
चरबी (फॅट) – ०.५ ग्रॅम
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन बी 6
मँगनीज
सेलेनियम
फायबर
कॅल्शियम
तांबे (Copper)
पोटॅशियम
फॉस्फरस
लोह

लसणाचे आरोग्यदायी फायदे –

१. रोगप्रतिकार शक्ती – लसणामध्ये ॲलिसिनसारखी संयुगे असतात; ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संक्रमणांशी लढा देण्यासही मदत होते.

२. हृदयाचे आरोग्य – लसणामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणे शक्य होते. तसेच लसणामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

३. दाहकविरोधी गुणधर्म – लसणामधील सल्फर संयुगांत दाहकविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील जळजळ आणि संधिवात यांसारख्या स्थितीची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

४. पचनक्रिया सुधारते – लसूण पचनास मदत करून आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि लसणातील प्रतिजैविक गुणधर्मांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

५. कर्करोग प्रतिबंध – काही अभ्यासकांनी असे सुचवले आहे की, लसणाच्या सेवनाने विशेषत: पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. लसणातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मांमुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध होतो.

६. अँटिऑक्सिडंट गुणधर्म – लसणात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करायला मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि आजारांचा धोका कमी करतात.

मधुमेही रुग्ण लसूण खाऊ शकतात का?

एकता सिंघवाल म्हणाले की, मधुमेह असलेल्या व्यक्ती लसूण खाऊ शकतात. शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे आणि मधुमेहाशी संबंधित हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास लसूण मदत करू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तसेच ही बाब लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की, रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि वैयक्तिक आहाराच्या सल्ल्यासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणेही तितकेच आवश्यक आहे.

गर्भवती महिलांसाठी लसणाचे सेवन फायदेशीर आहे का?

एकता सिंघवाल यांनी नमूद केले की, लसूण ही सामान्यतः गर्भवती महिलांसाठी सुरक्षित मानली जाते; जेव्हा अन्न घटक म्हणून त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले जाते. लसूण व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ व मँगनीज यांसारखी आवश्यक पोषक घटक प्रदान करतो; ज्यामुळे संपूर्ण आरोग्या चांगले राखले जाते. तसेच त्यांनी हेसुद्धा नमूद केले आहे की, गर्भधारणेदरम्यान कच्च्या लसणाचे जास्त सेवन टाळले पाहिजे.

लसणाचे सेवन करताना लक्षात ठेवण्याजोग्या महत्त्वपूर्ण गोष्टी –

ॲलर्जी – काही व्यक्तींना लसणाची ॲलर्जी असू शकते. त्यामध्ये त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अस्वस्थता यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहणे महत्त्वाचे आहे.

दुर्गंधी – लसणामुळे काही लोकांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास, तीव्र वास व शरीराला दुर्गंधी अशा समस्या जाणवू शकतात. त्यासाठी ब्रेथ फ्रेशनर्स वापरल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

तिसरे म्हणजे लसूण काही औषधांशी संबंधित असू शकते. जसे की, रक्त पातळ करणारी आणि एचआयव्ही/एड्स औषधे. विशेषतः जर तुम्ही औषधे नियमितपणे घेत असाल, तर त्याबाबत हेल्थकेअर प्रोफेशनलशी बोलून, त्यांच्याशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

मिथक आणि तथ्ये –

पहिला गैरसमज – लसूण सर्व इन्फेक्शन्स बरे करू शकतो?

लसणात प्रतिजैविक गुणधर्म असतात. ते संक्रमणाशी लढण्यास मदत करू शकतात. पण, लसूण सर्व इन्फेक्शन्स स्वतःच बरे करू शकत नाही. त्यासाठी वैद्यकीय उपचारसुद्धा आवश्यक असू असतात. कच्च्या लसणात खोकला आणि सर्दी संसर्ग बरा करण्याची क्षमता असते.

दुसरा गैरसमज – कच्चा लसणाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल त्वरित कमी होऊ शकते का?

लसणाचे सेवन कालांतराने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास हातभार लावू शकतो. पण, हा त्वरित उपाय नाही. जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसू शकतो. तर आज आपण या लेखातून लसणाचे आरोग्यदायी फायदे पाहिले आहेत.

Story img Loader