कोरोना विषाणूचे सावट कमी होत नाही तोवर जगावर H5N1 या बर्ड फ्लूचं सावट निर्माण झालं आहे. कंबोडियाच्या प्री वेंग प्रांतात एका 11 वर्षीय मुलीचा H5N1 ह्युमन एव्हियन इन्फ्लूएंझा अर्थात बर्ल्ड फ्लू विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मृत मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. २०१४ नंतर H5N1 विषाणूच्या संसर्गाची ही दक्षिण आशियाई देशातील पहिलीच घटना आहे, अशी माहिती कंबोडियाचे आरोग्यमंत्री मॅम बुन्हेंग यांनी दिली आहे. या विषाणूवर आता जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मुलीच्या वडिलांच्या अहवालानंतर H5N1 विषाणू मानवाकडून मानवाकडे प्रसारित होण्याची शक्यता जास्त असल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये वाढत्या फ्लूच्या घटनांवरून परिस्थती भयानक असल्याचे म्हटले आहे.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Leopard's Viral Video
‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

कंबोडियामध्ये H5N1 व्हायरसच्या संसर्गामुळे मुलीचा मृत्यू

आग्नेय कंबोडियातील प्री वेंग प्रांतातील एका 11 वर्षीय मुलीला 16 फेब्रुवारी रोजी ताप, खोकला आणि घसा खवखवण्याची लक्षणे आढळून आली. यानंतर बुधवारी H5N1 बर्ड फ्लू संसर्गामुळे तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांनी तिच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे नमुने घेतले. या नमुन्यांच्या चाचणीत मुलीच्या 49 वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

WHO ने व्यक्त केली चिंता

H5N1 बर्ड फ्लू संसर्गाच्या घटनांवर आता जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कंबोडियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मानवामध्ये क्वचितच बर्ड फ्लूचा संसर्ग होतो. सहसा असे संक्रमित पक्षाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होते, असे डब्यूएचओने म्हटले आहे. त्यामुळे आता कंबोडियातील आरोग्य अधिकारी H5N1 संक्रमित मृत मुलगी आणि वडील संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आले होते की नाही याचा तपास करत आहेत. या तपासाअंती लवकरच हे समजेल की, हे संक्रमण मानवातून मानवात झाले आहे का. या विषाणूवर आता जागतिक आरोग्य संघटनेकडून संशोधन सुरु आहे.

तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य हवे आहे? मग सकाळी नाही तर, ‘या’ वेळेत करा व्यायाम, रिसर्चमधून खुलासा

इतर देशांना सतर्क राहण्याचे आवाहन

H5N1 च्या वाढत्या संसर्गामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आता इतर देशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत मानवामध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे दुर्मिळ होती, परंतु आता इतकी संभाव्य प्रकरणे आहेत. सुरुवातीच्या प्रकरणामुळे हा संसर्ग इतर मानवांमध्ये पसरला आहे की नाही याबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

केवळ पक्षांसाठीचं नाही तर प्राणी आणि माणसांनाही धोका

H5N1 हा विषाणू केवळ पक्षांसाठीचं नाही तर प्राणी आणि मानवासाठीही तितकाच धोकादायक आहे. या विषाणूची लागण झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येणारे प्राणी आणि मानव यांना सहज संसर्ग होऊ शकतो.

H5N1 बर्ड फ्लूची लक्षणे

खोकला (सामान्यतः कोरडा खोकला)

घसा खवखवणे, नाक चोंदणे किंवा नाक सतत वाहणे

थकवा, डोकेदुखी

थंडी वाजून येणे, ताप

सांधेदुखी, स्नायू दुखणे, घसा खवखवणे

नाकातुन रक्तस्त्राव

छाती दुखणे