Sonam Kapoor Lost 20 Kgs Weight Post Partum: बॉलिवूडची फॅशन आयकॉन अशी ओळख असलेल्या सोनम कपूरने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. वायूच्या जन्मानंतर अभिनेत्रीने आता तब्बल २० किलो वजन कमी केले आहे. पूर्वीच्या वजनावर येण्यासाठी सोनमला तब्बल २६ किलो वजन कमी करायचे होते. सध्या ती या वजन कमी करण्याच्या प्रवासात असून याबाबत अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका स्टोरी शेअर करत माहिती दिली. पोस्टपार्टम म्हणजेच प्रसूतीच्या नंतरच्या कालावधीत वजन कमी करण्याबाबत अनेक महिलांना कुतूहल असते. बाळंतपणानंतर विशेषतः जोपर्यंत बाळाला दूध पाजायचे असते तोपर्यंत आईला आहारात अचानक बदल करून चालत नाही शिवाय शरीरही नाजूक झाले असल्याने पटकन उच्च तीव्रतेचा व्यायामही करणे शक्य नसते. अशावेळी वेळ घेऊन वजन कमी कसे करायचे व त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी आज आपण तज्ज्ञांची माहिती जाणून घेणार आहोत.

डॉ. सुश्रुता मोकादम, सल्लागार प्रसूती तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, गर्भधारणेत एखाद्या महिलेचे वजन साधारणतः १०-१५ किलो वाढते आणि बहुतेक स्त्रिया बाळंतपणानंतर पहिल्या तीन महिन्यांत वजन कमी करतात. ज्यांचे वजन खूपच वाढलेले असते (असं म्हणूया २० किलो किंवा त्याहून अधिक वजन वाढलेले असते) तेव्हा बाळाचे व आईचे आरोग्य लक्षात घेऊन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

सोनम कपूरने कमी केले २० किलो वजन

प्रसूतीनंतर वजन कमी करताना ‘या’ बाबींकडे लक्ष द्या..

संतुलित आहाराने सुरुवात करा. फळे, भाज्या, डाळीच्या स्वरूपातील प्रथिने आणि संपूर्ण धान्ये यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात असायला हवा. तुम्ही बर्न करता त्यापेक्षा कमी कॅलरीजचे सेवन केल्यास पोषणाची आकडेवारी जुळून येण्यास मदत होऊ शकते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम एकत्रित करून चांगले व्यायामाचे रुटीन सेट करायला हवे. हळूहळू सुरवात करू शकता व मग टप्प्याटप्प्याने उच्च तीव्रतेच्या व्यायामाकडे वळा. मनोरंजन करणारे व्यायाम प्रकार जसे की झुंबा असे पर्याय तुमची व्यायाम करण्याची इच्छा टिकवून ठेवण्यासाठी फायद्याचे ठरतात.

हायड्रेटेड रहा, कारण चयापचय आणि एकूण आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे. साखरयुक्त पेये आणि जास्त स्नॅक्स टाळा, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कमी प्रमाणात अनेकदा जेवणाचा पर्याय निवडा.

झोपेशी तडजोड करू नका, कारण अपुरी विश्रांती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा आणू शकते. डॉ अर्चना बत्रा, पोषणतज्ज्ञ , फिजिओथेरपिस्ट आणि प्रमाणित मधुमेह नियंत्रण प्रशिक्षक, गुडगाव यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, विश्रांती घेतल्याने तणाव नीट हाताळता येतो त्यामुळे कुटुंबियांच्या मदतीने बाळाच्या झोपेशी जुळवून घेत स्वतः सुद्धा विश्रांती घ्या.

वजन कमी करायचा हेतू असेल तरी फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करून चालणार नाही. यासाठी परंतु नॉन-स्केल घटक जसे की वाढलेली ऊर्जा पातळी आणि सुधारित मूड याकडे बारकाईने लक्ष द्या.

हे ही वाचा<< १२१ किलोच्या इन्फ्लुएन्सर तरुणीने पालटलं रूप; ४० किलो वजन कमी करतानाचा डाएट व ‘चीट डे’ ची हॅक केली शेअर 

डॉ बत्रा यांनी दिलेला सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे “तुमच्या प्रवासाची इतरांशी तुलना करणे टाळा; प्रत्येक शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते. तुमच्या शरीराची शक्ती ओळखा व तुम्ही पूर्ण केलेले लहान लहान यशस्वी टप्पे सुद्धा साजरे करा.”