नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्ष म्हटलं की नवे संकल्प, नव्या गोष्टी. नव्या वर्षाच्या निमित्ताने आहाराच्या नव संकल्पनेला सुरुवात करूया. कधी साखर बंद करा, कधी भात बंद करा, कधी गहूच बंद करा, कधी पाणी भरपूर प्या, कधी पाणी पिऊच नका, कधी दूध पिऊ नका, कधी फळ खा, तर कधी फळ खाऊ नका. एक ना अनेक असे वेगवेगळ्या आहाराचे ट्रेंड्स येत असतात आणि त्यामुळे आपल्या नेहमीच्या आहाराची सोपी गणितं अनेकदा कठीण होऊन जातात.
हेही वाचा : सकाळी चालावं की संध्याकाळी, तज्ज्ञांनी वाद सोडवला! तुमच्यासाठी कोणत्या वेळी, किती चालणं योग्य ठरेल पाहा
नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर काही गोष्टींचे आपण सुरुवात करूया दररोज पंधरा मिनिटं स्वतःसाठी दिले तर तुमचे आहाराचे आणि व्यायामाचे गणित सोपे होऊ शकते. म्हणजे कसं तर सकाळी उठून तर दररोज खालील गोष्टी २०२४ मध्ये दिवसाच्या चोवीस तासात किमान २४ मिनिट तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. तुमच्या खाण्यापिण्याचे नियोजन हे केले जाऊ शकते एक दररोज किमान २०२४ साठी आहाराचे २४ नियम
१ दररोज किमान २४ मिनिटे व्यायाम करा
२ पुढच्या आठवड्यात लागणारी फळे आणून ठेवा. लागणाऱ्या भाज्याही आणून ठेवा.
३ रोज किमान दोन फळे तरी खाल्ली जातील याची काळजी घ्या.
४ भारतीय मसाल्यांचा आहारामध्ये नक्की समावेश करा.
५ जिरे किंवा धने याचे पाणी नियमितपणे आहारात समाविष्ट करा.
६ जर तुम्हाला मधुमेह असेल असेल तर साखरेचे प्रमाण तपासून विशिष्ट औषधी पाणी आहारात समाविष्ट करा.
७ महिन्यातून किमान २१ दिवस साखर पूर्णपणे व्रर्ज्य करा
८ फळं खाताना शक्यतो ती संपूर्णपणे चावून खा. त्याचा रस पिऊ नका.
९ आठवड्यातून किमान दोन दिवस आहारामध्ये आलं लिंबू किंवा ओली हळद आणि लिंबू यांचा रस समाविष्ट करा .
१० तहान लागण्याआधी पाणी प्या.
हेही वाचा : रिकाम्यापोटी आल्याचा रस पिण्याने पोटासाठी फायदा होतो का? काय आहेत टिप्स जाणून घ्या…
११ तुम्हाला आवश्यक असेल किंवा तुम्हाला जेवढी भूक असेल त्याहून अर्धेच अन्न ताटात घ्या.
१२ कोणतेही अन्नपदार्थ खाताना घाई करू नका ते हळूहळू चावून चावून नीट चावून खा.
१३ अन्न खाताना बसून खा.
१४ पाणी पिताना देखील बसून पाणी प्या.
१५ शक्य असल्यास पंधरा मिनिटे उत्तम सूर्यप्रकाशामध्ये चालण्याचा व्यायाम करा किंवा उत्तम सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करा.
१६ जेवणानंतर तेलबिया खा.
१७ एक चमचा तूप आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करा.
१८ भरपूर तेलात भाज्या तयार करण्यापेक्षा भाज्यांचे सॅलड आहारात समाविष्ट करा.
१९ मांसाहार करताना त्यात तेल नक्की वापरा.
२० कोणत्याही प्रकारची फळे दुधाबरोबर खाऊ नका.
हेही वाचा : दही खाणे आरोग्यासाठी खरंच चांगले असते का? काय आहे डॉक्टरांचं मत जाणून घ्या…
२१ दही ताक यासारखे दुधाचे पदार्थ ताजे असतील तरच खा.
२२ पालेभाज्या आहारात जरूर असू द्या.
२३ शक्यतो जेवण झाल्यानंतर वज्रासन जरूर करा.
२४ जेवल्यानंतर किमान २ तास झोपणे टाळा.