Office Snacks Must Have Food: ऑफिसमध्ये गेल्यावर दुपारच्या जेवणासाठी अनेकजण डबा नेतात त्यामुळे पैसे तर वाचतातच पण बाहेरचं खाणं सुद्धा कमी होतं. पण कधी ऑफिसमध्ये उशीर होतो किंवा संध्याकाळच्या वेळी अचानक थोडी भूक लागते आणि मग बाहेरचं तेलकट, मसालेदार काहीतरी खाल्लं जातं. हे टाळण्यासाठी आपण एक खास डबा सुद्धा आपल्या लंच बॅगमध्ये ठेवायला हवा. फक्त भुकेसाठीच नाही तर कामाच्या ठिकाणी उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा हा डबा कामी येऊ शकतो. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ रायन फर्नांडो यांनी या डब्यात कोणते तीन खाद्यपदार्थ असायलाच हवेत याविषयी दिलेली माहिती सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. या तीन गोष्टी आपल्या शरीराला चांगले काम करण्यास कशा मदत करू शकतात हे आता आपण जाणून घेऊया.

ऑफिसला नाश्त्यासाठी काय घेऊन जावं? (Office Snacks Tiffin)

डॉ बिजू केएस, मुख्य वैद्यकीय अधिकारी, व्हायरूट्स यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “सफरचंद, नट्स (काजू- बदाम), मनुका या तीन वस्तू कामाच्या ठिकाणी घेऊन जाणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. तुमचे काम बैठ्या स्वरूपात असो किंवा शारीरिक कष्ट करावे लागणार असो दोन्ही प्रकारात आपली ऊर्जा खर्ची होतेच. अशावेळी भूक लागल्यावर आपण पोषण पुरवणारे पदार्थ खाल्ल्यास भूक तर कमी होतेच पण उत्पादकतेसाठी सुद्धा फायदे होऊ शकतात. याउलट जर आपण रोजच्या रोज कटलेट्स, बर्गर, सामोसे असे पदार्थ खात असाल तर केवळ कॅलरीजमध्ये भर पडते व शरीरातही सुस्तपणा येतो.

घरी बनवलेली चटणी जास्त दिवस कशी साठवावी?
घरी बनवलेली चटणी जास्त दिवस कशी साठवावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
Standing Desks Is Good For Health Or Not
Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
MVA joint press conference
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? रमेश चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
best way to store egg to keep them fresh for longer know tips from experts
अंडे जास्त दिवस ताजे कसे ठेवावे? तज्ज्ञांनी सांगितली अंडी साठवून ठेवण्याची सोपी ट्रिक

आपण आकडेवारीनुसार समजून घेऊ, पाच मनुके तुमच्या एकूण सेवनात १०० कॅलरी जोडू शकतात त्या तुलनते तळलेल्या, बेक केलेल्या पदार्थांमधील कॅलरीज निश्चितच जास्त असतात. त्यामुळे जर तुम्ही हे अनहेल्दी पर्याय टाळून वर सांगितल्याप्रमाणे फळे,नट्स, ड्राय फ्रुट्सचे तर मिळणाऱ्या फायद्याचा अंदाज तुम्ही स्वतःही लावू शकता.

सफरचंद, सुका मेवा, वाळवलेली फळे का खावीत? (Benefits Of Apple, Dry Fruits, Nuts)

डॉ. बिजू यांनी हे ही अधोरेखित केले की, या तिन्ही पदार्थांमध्ये फायबर, प्रीबायोटिक्स असल्याने आतड्यांची हालचाल सुधारणे, मेंदूची शक्ती वाढणे, मानसिक शांतता प्राप्त होणे व ऊर्जा वाढणे यासाठी मदत होऊ शकते.

डॉ. बिजू त्यांच्या मते, फळे व सुक्या मेव्यात फायबर व इतर पोषक सत्व अधिक प्रमाणात असतात तर मीठ व साखर तुलनेने कमी असते (अर्थात तुम्ही प्रक्रिया न करताखात असाल तर) पण तरीही याही गोष्टींमध्ये कॅलरीज असतातच. अर्थात या कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने त्यांचा थेट वापर केवळ कामाच्या ठिकाणी ऊर्जा वाढवण्यासाठी होऊ शकतो व त्या शरीरात फॅट्स स्वरूपात साठून राहत नाहीत. यासाठी तुम्ही फळे किंवा सुका मेवा प्रमाणात खाणे सुद्धा आवश्यक आहे. परिणामी तुमच्या कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता आणि उत्पादकता यात सुधारणा होऊ शकते. आता हे प्रमाण किती असावं हे पाहूया.

फळे, सुका मेवा, नट्सचे सेवन करण्याचे प्रमाण किती आहे?

डॉ. बिजू सांगतात की दररोज एका मध्यम आकाराचं सफरचंद आपल्याला पुरेसं ठरतं. मनुका, अंजीर, वाळवलेली फळे खाणार असाल तर एका दिवसात पाच पेक्षा जास्त प्रमाण नसावं. काजू- बदाम, भोपळ्याच्या बिया अशा सुक्या मेव्याबाबत प्रमाण ठरवणारा नियम म्हणजे एक मूठभर (दररोज ३० ते ५० ग्रॅम) सुका मेवा आपण खाऊ शकता. म्हणजे एकूण एक मध्यम आकाराचं सफरचंद, पाच मनुके/ अंजीर किंवा मूठभर काजू- बदाम (सुकामेवा) असा डबा आपण ऑफिसच्या लंच बॅगमध्ये घेऊन जाऊ शकता. हा ठराविक नाष्टा तुम्हाला व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, सी, ई, के, लोह, मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि विविध अँटिऑक्सिडंट्स मिळवून देऊ शकतो.

हे ही वाचा<< रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या

लक्षात घ्या, एकच एक प्रकारची फळे खाण्याऐवजी आपण वेगवेगळं कॉम्बिनेशन करून नाष्ट्याचा डबा तयार करू शकता. जेणेकरून एका आठवड्यात तुम्ही सुमारे २५ प्रकारची फळे, भाज्या, नट आणि सुका मेवा खाऊ शकता. साधारणतः हा नाष्टा सर्वांसाठी आरोग्यदायी असू शकतो पण ज्यांना मधुमेह आहे किंवा वजन जास्त आहे त्यांनी वर सुचवलेल्या प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणात पदार्थ खावेत.