Yoga for Children : शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. योगाची उद्दिष्ट्ये आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगा हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग असावा. खरंच लहान मुलांना योगाची आवश्यकता आहे का? मुले खेळताना अशी अनेक आसने करतात, जे प्रौढ आणि तरुण लोकांना करायला त्रास होतो. याशिवाय वयाच्या आठ वर्षापर्यंत मुलांमध्ये पायनल ग्लँड (pineal gland ) सक्रिय असते, ज्यामुळे मुले नेहमी आनंदी राहतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जेव्हा लहान मुले तारुण्यावस्थेत येतात तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल होतात. पायनल ग्लँड एकदम शांत होते आणि पिट्यूटरी ग्लँड (pituitary gland) अधिक सक्रिय होते. लैंगिक क्रिया, मुलाला जन्म देणे, स्नायू आणि हाडे मजबूत होणे, शरीरातील चरबी वाढणे इत्यादी बदल त्यांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवरीही परिणाम करतात.
हेही वाचा : Sleep : पाच किंवा त्यापेक्षा कमी तास झोपेने ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना होऊ शकतो दीर्घकालीन आजार? वाचा काय सांगते संशोधन ….
आयुष्याच्या या टप्प्यावर मुलांना योगासने खूप मदत करू शकतात. पिट्यूटरी ग्लँडद्वारे सोडले जाणारे हार्मोन्स थेट त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात; ज्यामुळे मूड स्विंग, राग, चंचलपणा, बंडखोरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतो. यासाठी भारतात प्राचीन काळापासून उपनयन नावाचा एक सोहळा पार पाडला जातो आणि या सोहळ्याद्वारे सूर्यनमस्कार, नाडीशोधन, प्राणायाम आणि नामजप करण्याची सुरुवात केली जाते.
स्नायू आणि हाडांची वाढ, मानसिक समस्या, हार्मोन्समुळे येणारा स्ट्रेस, शारीरिक आणि मानसिक बदलांसाठी या तीन योग पद्धती चांगल्या आहेत. या तीन योगांमुळे मुलांची तारुण्यावस्था स्वीकारण्याची क्षमता वाढते.
ताडासन
हा एक सोपा योगा आहे. तारुण्यावस्थाकडे जाणाऱ्या मुलांसाठी हा योगा फायदेशीर आहे. हा योगा त्यांच्या मणक्याला ताणतो. याशिवाय एकाच बिंदूकडे पाहिल्यामुळे त्यांची स्थिर राहण्याची क्षमता वाढवते. यामुळे शरीरात संतुलन राहण्यास मदत होते.
- प्रथम दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या.
- दोन्ही पाय एकमेकांसमोर समांतर जोडून घ्या.
- दोन्ही पायांत हवे तेवढे अंतर आपल्या आवश्यकतेनुसार घ्या.
- दोन्ही हात डोक्याच्या दिशेन वर घ्या.
- दोन्ही हातांची बोटे डोक्याच्या वर एकमेकांमध्ये गुंफा. आता हाताचे तळवे वरच्या दिशेला घ्या.
- हात कोपरात सरळ असतील.
- डोळे न मिटता नजर कुठल्या एखाद्या वर्तुळाच्या मध्यभागी स्थिर ठेवा.
हेही वाचा : Heart Attack : महिलांमध्ये वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका; ‘या’ गोष्टी आहेत कारणीभूत
लोलासन
हा मुलांसाठी खूप मजेदार योगा आहे. कारण हा योगा ‘झुला’ प्रमाणे करावा लागतो. पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा योगा चांगला आहे. कारण यामुळे त्यांचे हात, मनगट आणि खांदे मजबूत होतात. पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि मज्जासंस्थेमध्ये (nervous system) संतुलन आणते
- पद्मासनात बसा
- आपले तळवे आपल्या मांड्यांजवळ ठेवा.
- दीर्घ श्वास घ्या आणि आपले संपूर्ण शरीर उचला.
- संपूर्ण शरीर हातांवर संतुलित करा.
सर्वांगासन
हा योगा प्रकार मुलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या आसनामुळे मेंदूमध्ये रक्त पोहचण्यास मदत होते. यामुळे थायरॉइड ग्लँड्स नाहीसे होतात.
- पाठीवर झोपा. संथ गतीने तुमचे पाय, नितंब आणि पाठ उचला
- हाताच्या कोपरांना जमिनीवर आणि हाताच्या पंजांना पाठीवर दाबा.
- पाय आणि पाठीचा कणा हे दोन्ही एकदम सरळ ठेवा.
- शरीराचे वजन खांद्यांवर आणि हातांवर उचला
- पाय हवेत स्थिर ठेवा.
- पायाच्या अंगठ्याला नाकाच्या सरळ रेषेत आणा.