Back Pain Cure: पाठीची दुखणी आजकाल प्रत्येक वयात होऊ लागली आहेत. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचारी वर्गापर्यंत अनेकांची जीवनशैली बैठी असल्याने सांधेदुखी ही कॉमन समस्या झाली आहे. मुख्य म्हणजे प्रश्न इतका कॉमन असूनही त्यावर उपाय हे फार खर्चिक आहेत. पाठीच्या दुखण्यावर आयुर्वेदिक उपचार करणे हे वेळखाऊ वाटत असणाऱ्यांना एर्गोनॉमिक खुर्च्या, स्टँडिंग डेस्क आणि बॅक सपोर्ट गॅझेट असे पर्याय वापरावे लागतात पण याच्या किमती प्रचंड असतात. पण आज आपण या सगळ्या दुखण्यावर व खर्चावर एक साधा सोपा रोजच्या आयुष्यात करता येणारा उपाय पाहणार आहोत. इंडियन एक्सस्प्रेसने डॉ सिद्धार्थ शाह, सल्लागार ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, एस एल रहेजा हॉस्पिटल, यांच्याशी संवाद साधून पाठीच्या दुखण्यावरील एका उपायाविषयी माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in