Home remedies to open blocked nose : हिवाळ्यात प्रचंड प्रमाणात गारवा असतो. या हंगामात अनेक आजार डोके वर काढतात. थंडी आणि सर्दीमुळे नाक बंद होण्याची समस्या होते. यामुळे श्वास घेणे, बोलणे कठीण होऊ बसते. चेहरा आणि डोके देखील दुखू शकते. काही घरगुती उपयांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंद नाक मोकळे करण्याचे हे आहेत उपाय

१) स्टिम थेरेपी

बंद नाकासाठी स्टिम थेरेपी फायदेशीर ठरू शकते. यासाठी एका भांड्यात पाणी उकळा आणि नंतर टॉवेलने डोके झाकून वाफ घेण्याचा प्रयत्न करा. याने नाक खुले करता येऊ शकते.

(निट झोप येत नाही? खाण्यापिण्याच्या ‘या’ सवयी असू शकतात जबाबदार, तज्ज्ञांनी सांगितला उपाय)

२) गरम पाणी प्या

बंद नाकामुळे मेंदूशी संबंधित समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. या समस्या टाळण्यासाठी गरम पाणी प्या. लवकर आराम पाहिजे असल्यास गरम पाण्यात मध आणि आल्याचे रस मिसळून प्या. याने बंद झालेले नाक खुलण्यास मदत होऊ शकते आणि खोकल्यापासूनही आराम मिळू शकते.

३) नेजल स्प्रेचा वापर

बंद नाक खुले करण्यासाठी नेजल स्प्रे उपलब्ध आहे. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा वापर करू शकता. नेजल स्प्रे छोटे असल्याने ते कुठेही नेता यऊ शकते.

(‘या’ खाद्यपदार्थांचे करा सेवन, वजन कमी करण्यासह मधुमेहाचा धोका टाळण्यात करतील मदत)

४) मसालेदार अन्न खाणे

बद्धकोष्ठता, कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी मालेदार अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, बंद नाक खुले करण्यासाठी मसालेदार जेवण मदत करू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)