रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या किंवा अडथळा निर्माण झाल्यास त्याला एथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात. ह्रदयविकारास कारणीभूत ठरणारा हा एक महत्त्वपूर्ण धोकादायक घटक आहे. पण, चांगली बातमी अशी आहे की, या समस्येचा सामना तुम्ही तुमच्या आहारात बदल करून करू शकता. रोजच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका कमी करू शकता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याची काळजी घेऊ शकता.

हैदराबादचे बंजारा हिल्स, केअर हॉस्पिटल्सचे, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. पी प्रणीत यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे टाळण्यासाठी आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाच सुपरफूडचा आहारात समावेश करा.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

हेही वाचा – तुम्हाला जीवनसत्वे बी समृद्ध आहाराची गरज का आहे? कोणत्या पदार्थांमधून मिळते B12 आणि B3? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

१) फॅटी फिश: ओमेगा-३ ने समृद्ध ( Fatty Fish: Champions of Omega-3s)

सॅल्मन, मॅकेरल आणि इतर फॅटी फिश हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध आहेत. हे अत्यावश्यक फॅट्स, दाहकता, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्या रक्तातील खराब फॅट्स विरुद्ध लढण्याचे काम करते. ते एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉलदेखील वाढवते, जे तुमच्या रक्तवाहिन्यांमधून खराब प्रकारचे एलडीएल (खराब कोलेस्ट्रॉल) काढून टाकण्यास मदत करते. ओमेगा -३ रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेक तयार होणे टाळण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाह व्यवस्थित होतो आणि रक्तवाहिन्या लवचिक होतात.

२) बेरी : अँटिऑक्सिडेंट समृद्ध (Berries: Antioxidant Powerhouses)

गोड आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध बेरी आणि स्टॉबेरीसारख्या बेरी हृदयासाठी अनुकूल पर्याय आहेत. हे अँटिऑक्सिडंट्स विशेषत: फ्लेव्होनॉइड्स, दाहकता आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात. तुमच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. बेरीदेखील फायबरचा एक चांगला स्रोत आहेत, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देतात, म्हणून तुमच्या नाश्त्यामध्ये एक कप बेरी घाला किंवा स्नॅक्स म्हणून त्यांचा आनंद घ्या.

हेही वाचा – द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान आठवड्यातील सहा दिवस १२ तास काम करीत होती प्रियांका चौप्रा! शरीरावर काय होतो परिणाम; तज्ज्ञ काय सांगतात….

३) नट्स : हृदयासाठी आरोग्यदायी नाश्ता (Nuts: A Heart-Healthy Snack)

बदाम, अक्रोड आणि इतर नट हे असंतृप्त फॅट्स, फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध पौष्टिक पदार्थ आहेत. रक्तवाहिन्या बंद करणारे LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांचे आरोग्यदेखील सुधारतात. शिवाय नट्स एक अतिरिक्त फायदा देतात, तो म्हणजे ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् जे तुमच्या हृदयाला दाहकता कमी करणारा पदार्थ म्हणून मदत करतात.

४) ऑलिव्ह ऑइल (Olive Oil: Nature’s Liquid Gold)

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलला स्वयंपाकघरात मानाचे स्थान आहे. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंटने समृद्ध ऑलिव्ह ऑइल हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी आश्चर्यकारकपणे कार्य करते. हे दाहकता कमी करते, LDL कोलेस्ट्रॉल कमी करते आणि एंडोथेलियम आणि तुमच्या रक्तवाहिन्यांचे अस्तर (the lining of your blood vessels) कार्य सुधारते. आपल्या आहारात ऑलिव्ह ऑइलचा नियमित समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. ते सॅलेडवर शिंपडा, स्वयंपाक करण्यासाठी वापरा किंवा ब्रेडला लावून खा.

५) हिरव्या पालेभाज्या : निसर्गाचे व्हिटॅमिन बूस्ट (Leafy Green Vegetables: Nature’s Vitamin Boost)

पालक आणि केलं (kale – एक प्रकारची पालेभाजी) यांसारख्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात. ते विशेषतः व्हिटॅमिन केमध्ये समृद्ध आहेत, जे ढाल म्हणून कार्य करते, तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये कॅल्शियम जमा होणे टाळते. पालेभाज्यांमधील आणखी एक मौल्यवान घटक नायट्रेट्स विसरू नका, जो रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

लक्षात ठेवा, उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो, म्हणून या हृदयासाठी निरोगी आहाराचे पर्याय निवड करा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या!

Story img Loader