How To Make Masala Chai: चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफीन असते, त्यात अँटीऑक्सिडंट असतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, जळजळ दूर करते आणि कर्करोग आणि हृदयविकाराच्या विरूद्ध आरोग्यास चालना देते. पण म्हणतात ना ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. तसंच काहीसं चहाचं आहे. आपण भारतीय आदरातिथ्य, मैत्री, प्रेम अगदी वादातही चहाला काही विसरत नाही. त्यात आता असा वेळी- यावेळी पाऊस आला तर मग चहाशिवाय आपल्याला करमत नाही. वारंवार चहा घेतल्याने शरीरावर काय परिणाम होतो याविषयी आपण आजवर अनेकदा वाचले असेल पण आज आम्ही तुमच्या प्रश्नावर डॉक्टरांचे उत्तर घेऊन आलो आहोत.
डॉ. डिंपल जांगडा यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये चहा बनवताना वापरायच्या काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. यामुळे आपण चहामुळे शरीराला होणारे नुकसान नियंत्रणात राहू शकते व कालांतराने कमी होऊ शकते असेही त्या सांगतात. आता या टिप्स कोणत्या हे पाहूया…
1) जास्त टॅनिन नसलेली उच्च दर्जाची चहाची पाने निवडा. यासाठी तुम्ही चहाचा पॅक खरेदी करताना सगळं साहित्य व त्याचे प्रमाण वाचूस्वहक्त
2) चहाच्या मसाल्यांमध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. तुम्ही चहाचा मसाला घरीही बनवून ठेवू शकता.
3) चहामध्ये दूध घातल्यास अधिक वेळ शिजवावे लागते. दुधातील लॅक्टिक ऍसिडमुळे आम्लता निर्माण होते व यामुळे तुम्हाला अधिक ऍसिडिटी जाणवू शकते. तसेच दुधामुळे गोडव्याचे प्रमाण वाढून मधुमेहाचा सुद्धा धोका असतो. त्यामुळे शक्य झाल्यास दुधाविना चहा प्या. अन्यथा दुधाचे पर्याय (ओट्स मिल्क, सोया मिल्क, बदाम मिल्क) यांचा वापर करा.
4) रिफाईंड साखरेऐवजी खडी साखर, गूळ वापरा यामुळे गोडाचे प्रमाण संतुलित राहते.
हे ही वाचा<< जास्त कॅलरीजच्या सेवनाने वजन दोन महिन्यात कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलेलं रिव्हर्स डाएट कसं येईल कामी, पाहा
5) रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. तुमच्या पोटात कार्बोहायड्रेट्स असल्यावर चहा पिणे उचित ठरते. शक्यतो ब्रेकफास्ट नंतर एक कप चहा घ्या पण संध्याकाळी 4 नंतर कधीही चहा पिऊ नका. यामुळे शरीरात सर्कॅडियन आणि मेलाटोनिन उत्पादनात व्यत्यय येतो व झोप लागत नाही.
चहा बनवायची उत्तम पद्धत (Best Way To Make Tea)
थोडं पाणी गरम करून त्यात दालचिनी, वेलची, लवंगा, ताजे किसलेले आले, काळी मिरी, असे मसाले घालून चांगले उकळा. त्यात काही ताजी पुदिन्याची किंवा तुळशीची पाने वापरू शकता. शक्य असेल तर चहाची पाने किंवा मग नियमित पावडर टाकून चांगले उकळा. कपमध्ये गाळून घ्या करा आणि कपमध्ये थेट बदामाचे दूध किंवा नारळाचे दूध घालून प्या.