मान्सून सुरू झाला आहे. जरी ऋतूमध्ये ताज्या हवेत श्वास घेता येत असला तरीही त्यात ऍलर्जी आणि संसर्गाचा धोका वाढतो. हवेतील आर्द्रतेमुळे रोगजनकांच्या वाढीस चालना मिळते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये पौष्टिक-समृद्ध अन्न हेच आपल्याला मदत करते. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हैदराबादच्या केअर हॉस्पिटल्स हायटेक सिटीमध्ये सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट येथे कार्यरत असलेले डॉ. सतीश सी रेड्डी यांनी मान्सूनमध्ये निरोगी आहार घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
“आर्द्रतेमुळे आतड्यात हानिकारक जीवाणू आणि बुरशीची वाढदेखील होते. हे आतड्याच्या कार्यामध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता असते”, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले. “दूषित अन्न आणि पाण्यामुळेदेखील धोका निर्माण होतो, तर कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे आतड्यांचे आरोग्य खराब होते. खराब पचनक्रियेमुळे आणखी गुंतागूंत वाढू शकते.”
“योग्य अन्न निवडीमुळे तुमचे आतड्याचे आरोग्य चांगले राहते आणि या समस्या कमी होतात.” डॉ. रेड्डी यांच्या मतानुसार येथे ७ पदार्थ शिफारस केले आहे ज्यांच्या सेवनामुळे पावसाळ्यात आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकतो.
पावसाळ्यात ॲलर्जीचा सामना करण्यासाठी आणि आतड्याच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी सात पदार्थांचे सेवन करा
१) हळद : या मसाल्यामध्ये कर्क्युमिन, एक शक्तिशाली (विरोधी दाहक) अँटी-इन्फ्लमेंटरी आणि अँटिऑक्सिडेंट आहे, जो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि ॲलर्जिक प्रतिक्रिया कमी करतो.
२) आले : एक सुप्रसिद्ध दाहकविरोधी आणि प्रतिजैविक घटक असतात. आले हे पचनास मदत करते, जळजळ कमी करते आणि श्वसनाच्या समस्यांशी लढण्यास मदत करते.
हेही वाचा – चहामध्ये तूप टाकून प्यावे का? आतड्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….
३) लसूण : नैसर्गिक प्रतिजैविक आणि अँटीव्हायरल पॉवरहाऊसने समृद्ध असलेले लसूण रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करते आणि सामान्य सर्दी टाळण्यास मदत करते.
४) दही : प्रोबायोटिक्सयुक्त दही पचन सुधारण्यासाठी आणि आतड्यातील निरोगी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते. हे रोगप्रतिकारकशक्तीदेखील वाढवते आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनला प्रतिबंध करते.
५) कारले : भाजीचे नाव ऐकून नाक मुरडू नका! कारल्याचे प्रतिजैविक गुणधर्म पचन संस्था स्वच्छ करतात आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.
६) हिरव्या पालेभाज्या : पालकसारख्या हिरव्या भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ते तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात.
७) लिंबूवर्गीय फळे : संत्री, लिंबांमध्ये भरपूर ‘ व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी एक प्रमुख रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा घटक आहे, जो संसर्गाचा सामना करतो आणि दाहकविरोधी फायदे देतो.
या पावसाळ्यात तुमच्या आहारात या ७ पदार्थांचा सामावेश करून तुम्ही निरोगी आणि ॲलर्जीमुक्त रागू शकता आणि पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता!