International Day of Happiness : आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी कित्येक गोष्टी करत असतो पण आपण आनंदी किंवा दुखी असताना आपण काय खातो याकडे लक्ष देतो का? नसेल तर आता तुम्हाला लक्ष द्यायला हवे. कारण आपल्या मानसिक स्थितीचा आणि आपण काय खातो यामध्ये खूप मोठा संबध आहे. आपल्यापैकी बरेच जण आपल्या मुडनुसार अन्नाचे सेवन करतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुखी किंवा तणावग्रस्त असते तेव्हा मुड सुधारण्यासाठी आवडते पदार्थ खाते. याउलट जेव्हा व्यक्ती आनंदी असते तेव्हाही ती आवडते पदार्थ खाते. नुकत्याच एका संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, ७२ टक्के भारतीयांनी कबूल केले आहे की, जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा अधिक स्नॅक्स् खातात.
आंतरराष्ट्रीय आनंद दिनापूर्वी, आनंदाला अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन करणारा गोदरेज यम्मीझचा इंडिया स्नॅकिंग अहवाल (खंड I) समोर आला आहे. `STTEM’ – सुरक्षितता, तंत्रज्ञान, चव, सुलभता आणि मूड सुधारणे या पाच घटकांवर भर देणाऱ्या या अहवालमध्ये, स्नॅक्स् खाण्यामुळे मुडमध्ये सुधारणा कशी होते यावर प्रकाश टाकला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा