Early Signs Of Oral Cancer: तोंडाचा कर्करोग, ही एक अशी गंभीर आरोग्य स्थिती आहे, जी बऱ्याचदा अगदी नगण्य लक्षणातून डोकं वर काढते पण वेळीच लक्ष न दिल्यास जीवघेणी ठरू शकते. तोंडाचा कर्करोग हा संपूर्ण तोंडात कुठेही होऊ शकते. तरीही नेमकं सांगायचं तर, मायो क्लिनिकच्या मते, ओठ, हिरड्या, जीभ, गालाचे आतील अस्तर, तोंडाचे छप्पर आणि तोंडाच्या फरशीवर (जीभेखाली) तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. डॉ मृदुल मल्होत्रा, सल्लागार-मेडिकल ऑन्कोलॉजी, मणिपाल हॉस्पिटल यांनी फायनान्शियल एक्सस्प्रेसशी बोलताना मुखाच्या कर्करोगाच्या काही प्राथमिक लक्षणांविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार आपण कोणत्या लक्षणांच्या बाबत जागृत असायला हवे हे पाहूया..

तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे कोणती?

सतत तोंडाला फोड येणे: तोंडाच्या कर्करोगाच्या सर्वात सामान्य सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे घशामध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ वेदना होणे, किंवा जळजळ जाणवणे. ओठ, जीभ, हिरड्या किंवा गालांच्या आतील अस्तरांवर फोड येण्यापासून याची सुरुवात होते, सुरवातीला हे फोड वेदनारहित असतात.

IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
grandchildren of Nitin Gadkari did sthapna of Pancharatna Bappa
नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….

रक्तस्त्राव: कोणत्याही कारणाशिवाय तोंडातून रक्तस्त्राव होणे ही चिंताजनक बाब आहे. कर्करोगाशी संबंधित ऊतींच्या असामान्य वाढीचा हा परिणाम असू शकतो.

पांढरे किंवा लाल ठिपके: तोंडात ल्युकोप्लाकिया (पांढरे पॅच) किंवा एरिथ्रोप्लाकिया (लाल ठिपके) दिसून येऊ शकतात. हे डाग काहीवेळा लहानमोठ्या ऍलर्जीमुळे झालेले असू शकतात, तर अनेकदा कर्करोगाचे लक्षण ठरू शकतात. त्यामुळे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

गाठी होणे किंवा त्वचा घट्ट दिसणे: तोंडात किंवा घशात सूज किंवा गाठ आल्याचे दिसून येते, ही वाढ ऊतींमधील घातक बदलांचे परिणाम असू शकते.

गिळण्यात किंवा चघळण्यात अडचण: तोंडाच्या कर्करोगामुळे डिसफॅगिया (गिळण्यात अडचण) किंवा ओडिनोफॅगिया (गिळणे) होऊ शकते. ट्युमरमुळे अन्ननलिकेत अडथळा आल्याने हा त्रास होऊ शकतो.

सतत घसा खवखवणे: दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ सतत घसा खवखवणे, आवाजात बदल होणे असे त्रास जाणवणे हे मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक लक्षण असू शकते.

कान दुखणे: हे लक्षण कमी सामान्य असलं तरी, कोणत्याही संसर्गाशिवाय किंवा कारणाशिवाय कानाला वेदनाहोणे हे तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते.

सुन्नपणा किंवा संवेदना कमी होणे: जीभ, खालचा ओठ किंवा तोंडातील इतर भागात सुन्नपणा जाणवणे हा मज्जातंतूवरील ताणाचा परिणाम असू शकतो.

हे ही वाचा<< झोपण्याआधी ४ ते ५ मिनिटे बेडवर ‘या’ स्थितीत राहिल्याने केसवाढीला मिळतो वेग? तज्ज्ञांनी सांगितली प्रक्रिया व फायदे

डॉ. मल्होत्रा सांगतात की, तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा आवर्जून घ्यावा.